शिवसेनेच्या वतीने नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:43 AM2021-02-05T06:43:17+5:302021-02-05T06:43:17+5:30
गावकारभाऱ्यांनो हे सरकार तुमचं असून, तुमच्या गावाच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. शिवसेनेच्या माध्यमातून विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. ...
गावकारभाऱ्यांनो हे सरकार तुमचं असून, तुमच्या गावाच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. शिवसेनेच्या माध्यमातून विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. पुढील काळातही जागरुक राहून जनसेवा करूयात, असे आवाहन शिवसेना जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत यांनी केले.
माढा तालुक्यातील वाकाव येथे शिवसेनेच्या वतीने भावी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व निवडणूक लढविलेल्या उमेदवारांचा संयुक्तिक सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपळाई बुद्रुक,मिटकलवाडी,वाकाव, उंदरगाव, अंजनगाव उमाटे, तांदुळवाडी, बुद्रुकवाडी, केवड, विठ्ठलवाडीसह परिसरातील २५ ते ३० सरपंच व शंभराहून अधिक ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील समविचारी गटांची मोट बांधून पुढील काळात शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे शिवसेना नेते संजय कोकाटे व माजी झेडपी सभापती शिवाजीराजे कांबळे यांनी मत व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय तांबिले, हिंदू आरे, धनंजय माने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
वाकावचे भावी सरपंच ऋतुराज सावंत यांचा सत्कार शिवसेना व कोळी महासंघाचे अरुण कोळी यांच्यासह अनेकांनी केला.
यावेळी शिवसेनेचे संजय कोकाटे, उस्मानाबाद झेडपीचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, झेडपीचे माजी सभापती शिवाजी कांबळे, भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत, माजी सरपंच राजाभाऊ चवरे, माजी पंचायत समिती सदस्य पृथ्वीराज सावंत, किरण सावंत, उपळाईचे दीपक देशमुख, लक्ष्मण जाधव, मल्लिकार्जुन झाडबुके, पंढरपूर शहराध्यक्ष रवी मुळे, विक्रम सावंत, युवासेनेचे वैभव मोरे, तालुकाध्यक्ष मधुकर देशमुख, युवानेते मुन्ना साठे, शहराध्यक्ष शंभूराजे साठे, रामचंद्र मस्के, अरुण कोळी, गुरुराज कानडे, अतुल खुपसे, विलासराव देशमुख, अण्णासाहेब देशमुख, बापूसाहेब जाधव, इसाक शेख, नामदेव बाबर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळी ३०माढा०१
माढा तालुक्यातील नूतन ग्रामपंचायत सदस्य व पार्टी प्रमुखांचा सत्कार शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी प्रा. शिवाजीराव सावंत, संजय कोकाटे, शिवाजीराजे कांबळे, राजाभाऊ चवरे, मधुकर देशमुख, शंभूराजे साठे आदी.