अक्कलकोट तालुक्यातील अवैध वाळू रोखण्यासाठी नऊ पथके, कारवाईसाठी प्रशासन झाले जागे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:02 AM2017-11-24T11:02:09+5:302017-11-24T11:03:28+5:30

अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागातील सीना-भीमा नदीपात्रातून अवैधपणे बेसुमार वाळू तस्करी होत असल्याचे प्रकार ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे उघडकीस आणले.

Nine teams to control illegal sand in Akkalkot taluka, administration was awakened! | अक्कलकोट तालुक्यातील अवैध वाळू रोखण्यासाठी नऊ पथके, कारवाईसाठी प्रशासन झाले जागे !

अक्कलकोट तालुक्यातील अवैध वाळू रोखण्यासाठी नऊ पथके, कारवाईसाठी प्रशासन झाले जागे !

Next
ठळक मुद्देसीना-भीमा नदीपात्रातून अवैधपणे बेसुमार वाळू तस्करी३१ सप्टेंबर २०१७ रोजी सर्वच ठिकाणच्या वाळू उपसा परवान्याची मुदत संपलीचोरट्या पद्धतीने वाळू वाहतूक सुरू तडवळ भागातील रस्ते वाळू वाहतुकीमुळे धोकादायक


आॅनलाइन लोकमत सोलापूर
अक्कलकोट दि २४: अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागातील सीना-भीमा नदीपात्रातून अवैधपणे बेसुमार वाळू तस्करी होत असल्याचे प्रकार ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे उघडकीस आणले. याची दखल घेत तहसीलदार दीपक वजाळे यांनी नऊ महसूल मंडलांमध्ये प्रत्येकी एक असे नऊ पथक तयार करुन रात्रंदिवस कारवाईसाठी झटत आहेत.
३१ सप्टेंबर २०१७ रोजी सर्वच ठिकाणच्या वाळू उपसा परवान्याची मुदत संपली आहे. त्यानंतर नियमानुसार वाळू उपसा बंद करण्याऐवजी चोरट्या पद्धतीने वाळू वाहतूक सुरू होते. त्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात ‘लोकमत’ने तडवळ भागातील रस्ते वाळू वाहतुकीमुळे धोकादायक बनले आहेत. तडवळ भागात शंभरहून अधिक अवैध वाळू साठे आहेत. वाळू तस्करांनी वाहतुकीचा नवा मार्ग शोधला आहे. अशा पद्धतीने तीन दिवसांची मालिका प्रसिद्ध केली होती. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासन खडबडून जागे होऊन तहसीलदार वजाळे यांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे.
तहसीलदार वजाळे यांनी या पार्श्वभूमीवर तातडीने अक्कलकोट, चपळगाव, वागदरी, मैंदर्गी, दुधनी, करजगी, नागणसूर, तडवळ, किणी या नऊ महसूल मंडळातील सर्व मंडलाधिकारी, संबंधित गाव कामगार तलाठी यांची संयुक्त बैठक घेऊन मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी कुठल्याही प्रकारची तडजोड न करता सापडलेल्या त्या वाळू वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. अशाप्रकारे पथक कार्यरत करुन लेखी आदेश देण्यात आले आहेत. मागील पाच दिवसापांसून हे पथक चोरटी वाळू वाहतूक मार्गावर दबा धरुन बसले आहे. 
------------------------
यांचा आहे पथकात समावेश
शेगाव, धारसंग, देवीकवठे, कुडल, खानापूर, अंकलगे, म्हैसलगे, आळगे, गुड्डेवाडी, सुलरजवळगे, पानमंगरुळसह विविध ठिकाणी फिरते पथक कार्यरत ठेवण्यात आले आहे. हे पथक सोमवार ते शुक्रवार या कालावधीत रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत कारवाईसाठी सतर्क आहे. यामध्ये चपळगावचे मंडल अधिकारी एम. एल. स्वामी, जेऊर-जमादार, अक्कलकोट-एम. के. घोसले, तडवळ-पारसे, मैंदर्गी-बेलभंडारे यांच्यासह गाव कामगार तलाठी व कोतवालांचा समावेश आहे.
-------------------
अवैध वाळू उपसा विरोधात मोहीम चालू केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक मंडलामध्ये मंडल अधिकाºयांच्या नेतृत्वाखाली तलाठी व कोतवाल यांचे संयुक्त पथक तयार करून कारवाईसाठी कार्यरत ठेवले आहे. प्रत्येक मंडलात हे पथक आहे. खबºयामार्फत वाळू तस्करांना माहिती मिळत असली तरी लवकरच मोठ्या शिताफीने कारवाई करु व पूर्णपणे अवैध वाळू उपसा बंद करु.
-दीपक वजाळे, 
तहसीलदार, अक्कलकोट

Web Title: Nine teams to control illegal sand in Akkalkot taluka, administration was awakened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.