Good News; नव्वद वर्षाचे आजोबा अन् एक वर्षाचे बाळ झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 12:43 PM2020-05-09T12:43:40+5:302020-05-09T12:47:05+5:30

सोलापुरातील २९ जणांनी केली कोरोना वर मात; सोलापुरात १९६ जणांना झाली बाधा

Ninety-year-old grandfather and one-year-old baby became corona-free | Good News; नव्वद वर्षाचे आजोबा अन् एक वर्षाचे बाळ झाले कोरोनामुक्त

Good News; नव्वद वर्षाचे आजोबा अन् एक वर्षाचे बाळ झाले कोरोनामुक्त

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना विलीगीकरण कक्षात एकूण १०३ रुग्ण भरती झाले होतेमेडिकल कॉलेजच्या पथकाने त्यांच्यावर उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त केलेज्येष्ठ नागरिकांची जास्त काळजी घेणे गरजेचे

सोलापूर : श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना विलीगीकरण कक्षातून आतापर्यंत २९ रुग्णांना कोरोनामुक्त करुन घरी पाठविण्यात आले आहे. यामध्ये नव्वद वर्षाचे गृहस्थही होते तर एक वर्षाचे बाळही होते, अशी माहिती औषध वैद्यक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख तसेच कोरोना कक्ष प्रमुख डॉ. एच.व्ही. प्रसाद यांनी दिली आहे.

डॉ. प्रसाद यांनी सांगितले की, कोरोना विलीगीकरण कक्षात एकूण १०३ रुग्ण भरती झाले होते. त्यातील २९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. या २९ जणांत एक रुग्ण तब्बल ९० वर्षाचे होते तर एक रुग्ण केवळ एक वर्षाचे बाळ होते. मेडिकल कॉलेजच्या पथकाने त्यांच्यावर उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त केले आहे. एका रुग्णास न्युमोनिया होता, तसेच मुत्रपिंडाचा आजारही होता. त्यांच्यावर कोव्हिड आयसीयू मध्येच डायालिसिस करण्यात आले. त्यांच्या न्यूमोनियाही बरा झाला.

उर्वरित 26 रुग्णांपैकी सात लोकांना न्युमोनिया होता. पाच लोकांना घसा दुखीचा त्रास होता. उर्वरित 14 लोकांना कोरोना बाधा झाल्याची कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र यांना रक्तदाब, दमा, मधुमेह आणि ह्दयविकार आदी त्रास होते. मात्र त्यांच्यावर उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले.

विलीगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या 26 रुग्णांना न्यूमोनिया, 28 रुग्णांना घसादुखीचा त्रास होता म्हणून खोकला, ताप अथवा दम लागल्यास रुग्णालयांत तात्काळ येणे गरजेचे आहे. मृत झालेल्या रुग्णांपैकी बहुतांश 55 वषार्पेक्षा जास्त आहेत. म्हणून ज्येष्ठ नागरिकांची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे, असे डॉ. प्रसाद यांनी सांगितले.

Web Title: Ninety-year-old grandfather and one-year-old baby became corona-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.