छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी निर्भया पथक कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:22 AM2021-02-10T04:22:34+5:302021-02-10T04:22:34+5:30
मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर सहायक पोलीस निरीक्षक भगवान बुरसे, शिक्षण ...
मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर सहायक पोलीस निरीक्षक भगवान बुरसे, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, प्राचार्य शिवाजी चव्हाण, उपप्राचार्या तेजस्विनी कदम आदी होते.
निर्भया पथकामध्ये एक महिला पोलीस उपनिरीक्षक, दोन महिला पोलीस कर्मचारी, दोन पुरुष कर्मचारी, असे पाच जणांचे हे पथक आहे. हे पथक मंगळवेढा व सांगोला या दोन तालुक्यांत छेडछाड करणाऱ्यांवर करडी नजर ठेवणार आहे. मुलींची छेडछाड केल्यास त्या युवकास ताब्यात घेऊन प्रथमतः त्याच्यावर पहिला गुन्हा म्हणून पोलीस कर्मचारी समुपदेशन करतील. समुपदेशानंतर पुन्हा त्या युवकाने तसे कृत्य केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रणोती यादव यांनी सांगितले.
यावेळी पर्यवेक्षक राजू काझी, सुनील नागणे, विजय पानसरे, प्रियांका सूर्यवंशी, चन्नाप्पा म्हेत्रे, सर्जेराव वाघमोडे, तानाजी मुदगूल, अब्दुल खतीब यांच्यासह प्रशालेतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
---
इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेजमध्ये निर्भया पथकाची माहिती देताना महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणोती यादव.