चैत्रीवारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा; विठ्ठलाला द्राक्षांची आरास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 09:36 AM2021-04-23T09:36:40+5:302021-04-23T09:37:04+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
पंढरपूर : चैत्रीवारी शुध्द कामदा एकादशी निमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेची नित्यपूजा पुजारांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी मंदीर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या ॲड.माधवी निगडे, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी उपस्थितीत होते.
चैत्री शुध्द कामदा एकादशीनिमित्त मंदिरात द्राक्ष व द्राक्ष वेलींची आकर्षक सजावट करण्यात आली. सजावटीसाठी ७०० किलो द्राक्षाचा वापर करण्यात आला. संजय टिकोरे या भविकाने चैत्री शुध्द एकादशी निमित्ताने सजावटीसाठी द्राक्ष दिली. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदीर समितीच्यावतीने आवश्यक खबरदारी घेऊन उपाययोजना करण्यात आल्या होत्या.