आधी पोलिसांनी घेतली नाही दखल, न्यायालयाचा आदेश मिळताच गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:25 AM2021-09-24T04:25:59+5:302021-09-24T04:25:59+5:30
याबाबत अभिमान सटवाजी कवडे (वय ३८, रा.कॅन्सर हॉस्पिटलजवळ, बार्शी) यांनी तक्रार देताच पोलिसानी धीरज मनोहर गायकवाड व अनिल ...
याबाबत अभिमान सटवाजी कवडे (वय ३८, रा.कॅन्सर हॉस्पिटलजवळ, बार्शी) यांनी तक्रार देताच पोलिसानी धीरज मनोहर गायकवाड व अनिल रघुनाथ भुते (दोघे रा. मुसलमानवाडी, इचलकरंजी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही फसवणूक झाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी व तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रारी करूनही कार्यवाही केली नाही. म्हणून कवडे यांनी न्यायालयात ॲड. महेश जगताप यांच्या वतीने न्यायालयात फिर्याद दाखल केली असता त्यावर न्यायालयाने हा आदेश दिल्याने गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील आरोपी व फिर्यादीची ओळख झाल्याने मैत्री वाढत गेली. तर, फिर्यादी कवडे हे दरवाजे तयार करून त्याची विक्री व्यवसाय करतात. व्यवसायासाठी कर्जाची गरज झाल्याने ३ लाख येथील साई फायनान्समधून कमी व्याजाने मिळवून देतो. त्यासाठी प्रोसेसिंग फी द्यावी लागेल, असे सांगून वेळोवेळी दोन ४३ हजार ९५० रुपये बँक खात्यात जमा करावयास लावले, तर अनिल भुते याच्या खात्यात २७ हजार ११० रुपये भरावयास लावले.
.............
२० लाख रुपये भरून केला विश्वास संपादन
शिवाय, कवडे यांचा विश्वास निर्माण व्हावा, म्हणून त्याच्या खात्यावर २० लाख भरले, पण ते काही तांत्रिक कारण पुढे करून ते परत काढून घेतले आणि विश्वास निर्माण करून घेतला. त्यानंतर कवडे यांची फसवणूक केली.