दहा वर्षांपासून नाही ऑडिट.. महिला पतसंस्थेचं दप्तर घेतलं ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:19 AM2021-01-02T04:19:03+5:302021-01-02T04:19:03+5:30
२० ऑक्टोबर-२०१० रोजी शहरात प्रथमच महिला संस्था अस्तित्वात आली. तेव्हापासून आर्थिक व्यवहार सुरू झाले. बघता बघता तब्बल ३१८ सभासद ...
२० ऑक्टोबर-२०१० रोजी शहरात प्रथमच महिला संस्था अस्तित्वात आली. तेव्हापासून आर्थिक व्यवहार सुरू झाले. बघता बघता तब्बल ३१८ सभासद झाले. त्यांचे लाखो रुपये पिग्मी, आरडी, फिक्स डिपॉझिट वगैरे ठेवी झाल्या. काही दिवस सुरळीत व्यवहार सुरू राहिला. नंतर ही संस्था अचानकपणे डबघाईला आली. तेव्हा दर वर्षी केले जाणारे ऑडिट झालेच नाही. दप्तर अपूर्ण राहू लागले. म्हणून अक्कलकोट येथील सहायक निबंधक कार्यालयाने संबंधिताना बोलावून घेऊन सर्व प्रकारचे दप्तर ताब्यात घेतले. यामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाला आहे.
अनेक वर्षांपासून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते. संस्थेची एकूण उलाढाल ५० लाखापर्यंत असून इतके दिवस का लागतात चौकशीला हेच कळत नसल्याची खंत सभासद ज्येष्ठ नागरिक सुरेशचंद्र सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.
कोट ::::::::
या संस्थेचे दप्तर अपूर्ण असल्याने पूर्ण करून घेऊन ऑडिटसाठी सोलापूर येथे पाठवून दिले आहे. ऑडिटअंती कर्जदारांना वसुलीसाठी नोटीस काढण्यात येणार आहेत. १३ संचालक असून, पूर्णपणे बरखास्त करण्यात आले आहेत. संस्था अंतरिम अवसायकात आहे.
- सिद्धेश्वर कुंभार, तपासी अधिकारी
कोट ::::::::::
माझे २ लाख ५० हजार रुपये आरडी, पिग्मी या माध्यमातून या संस्थेकडे जमा आहे. पूर्णपणे आर्थिक व्यवहार बंद होऊन चार वर्ष झाले आहे. याबाबत संबंधित कार्यालयाकडे चौकशी केली असता, व्यवस्थित उत्तर मिळत नाही. सतत चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते. संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे.
- अंकुश केत, ग्राहक.
- सुनंदा राजेगावकर, चेअरमन