चार दिवस अंघोळ नाही; बादली, टॉवेल घेऊन विद्यार्थी जिल्हा परिषदेत; नेहरू वस्तीगृहात पाणी नसल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन

By शीतलकुमार कांबळे | Published: April 17, 2023 12:20 PM2023-04-17T12:20:51+5:302023-04-17T12:21:36+5:30

जिल्हा परिषदेच्या नेहरू शासकीय वसतीगृहात मागील चार दिवसापासून पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांनी आंघोळ केली नाही.

no bathing for four days students with bucket towels in zilla parishad students protest because of lack of water in nehru hostel | चार दिवस अंघोळ नाही; बादली, टॉवेल घेऊन विद्यार्थी जिल्हा परिषदेत; नेहरू वस्तीगृहात पाणी नसल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन

चार दिवस अंघोळ नाही; बादली, टॉवेल घेऊन विद्यार्थी जिल्हा परिषदेत; नेहरू वस्तीगृहात पाणी नसल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन

googlenewsNext

शीतलकुमार कांबळे, सोलापूर: जिल्हा परिषदेच्या नेहरू शासकीय वसतीगृहात मागील चार दिवसापासून पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांनी आंघोळ केली नाही. शेवटी संतापलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवार 17 एप्रिल रोजी बादली घेऊन जिल्हा परिषदेत आंदोलन केले. विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा यावेळी निषेध करण्यात आला.

नेहरू वसतिगृह ते जिल्हा परिषदमधील अंतर विद्यार्थ्यांनी घोषणा देत कापले. विद्यार्थ्यांनी बादली, टॉवेल, झाडू घेत आंदोलनात सहभाग घेतला. बनियन, टॉवेल आदी कपड्यावर जिल्हा परिषदेत ठिय्या मांडला. प्रशासनाने पाण्याचा प्रश्न न मिटवल्यास जिल्हा परिषदेसमोर अंघोळ करणार असल्याचे विद्यार्थांनी सांगितले.

विद्यार्थी 3 हजार 700 रुपये वसतिगृहाचे शुल्क भरतात. मात्र, त्यांना सुविधा दिल्या जात नाहीत. परीक्षेच्या काळात आंदोलन करावे लागत आहे. 41 अंश सेल्सिअस तापमानात आंघोळ न करता कसा अभ्यास करायचा असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: no bathing for four days students with bucket towels in zilla parishad students protest because of lack of water in nehru hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.