टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही.. संमिश्र बजेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:50 AM2021-02-05T06:50:00+5:302021-02-05T06:50:00+5:30
कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकास दर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल ...
कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकास दर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही. ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि ज्यांना निवृत्तीवेतन मिळते, अशांना बँकेतूनच व्याज मिळत असेल तर त्यांची वार्षिक आयकर गणना ही संबंधीत बँक निर्धारण करेल. सोने आणि चांदीवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय झाला. यामुळे काही प्रमाणात सोने चांदीच्या किमती घटतील. डिझेलवर ४ रुपयांचा कृषी सेस आणि पेट्रोलवर २ रुपये ५० पैशांचा कृषी सेस लावण्यात आल्याने पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ होऊ शकते. महागाई काही प्रमाणात वाढेल. एकंदरीत सदरचा अर्थसंकल्प हा संमिश्र स्वरुपाचा असा दिसून आला.
- ओंकारेश्वर उटगे, अक्कलकोट.
०१ओंकारेश्वर उटगे
---