वीज जोडणी नसतानाही आले साडेपाच हजार बिल ! जेऊरमधील प्रकार : महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:22 PM2017-12-26T12:22:48+5:302017-12-26T12:24:31+5:30
राज्य शासन शेतकºयांना कर्जातून केव्हा मुक्त करेल, असा प्रश्न सतावत असताना जेऊर (ता. अक्कलकोट) येथील एका शेतकºयाला वीज जोडणी नसतानाही महावितरणने साडेपाच हजार रूपयांचे बिल धाडून वसुलीचा रेटा लावला आहे. या प्रकारामुळे वीज कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
ईरप्पा बोरीकरजगी
आॅनलाइन लोकमत सोलापूर
जेऊर दि २६ : राज्य शासन शेतकºयांना कर्जातून केव्हा मुक्त करेल, असा प्रश्न सतावत असताना जेऊर (ता. अक्कलकोट) येथील एका शेतकºयाला वीज जोडणी नसतानाही महावितरणने साडेपाच हजार रूपयांचे बिल धाडून वसुलीचा रेटा लावला आहे. या प्रकारामुळे वीज कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
जेऊर येथील हुमायून बाबू मुल्ला या शेतकºयाने वीज जोडणीसाठी १७ जून २0१0 मध्ये कोटेशन भरले होते. अर्जामध्ये वीज जोडणीबरोबरच दोन खांबांचीही मागणी केली होती. खांब न मिळाल्यास स्वत: केबल वायर घेण्याचीही तयारी त्या शेतकºयाने दाखविली. तरीही वीज कंपनीने वीज जोडणी केली नाही; मात्र सात वर्षांनंतर त्यांनी वीज न दिलेल्या शेतकºयाच्या नावे ५ हजार ४८0 रुपयांचे बिल धाडले आहे. त्या शेतकºयाच्या नावाने वीज जोडणी तर नाहीच नाही. पण शेतीही त्याच्या नावावर नाही. आलेल्या बिलाबाबत वीज कंपनीच्या कार्यालयात चौकशी करण्यास गेले असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.
-------------------
शेतीची विक्री...
- सात वर्षांत वीज जोडणीसाठी वारंवार मागणी करूनही काहीच उपयोग झाला नाही. यामुळे त्या शेतकºयाने शेतीची विक्री केली. आता त्यांच्याकडे शेती नाही. वीज जोडणी नाही आणि वापर तर नाहीच नाही. असे असताना बिल पाठवून त्या शेतकºयाला वीज कंपनीने मनस्ताप देण्याचा प्रयत्न केला आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी याची चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी शेतकरी हुमायून मुल्ला यांनी केली आहे