ना हॉटेल, ना पाणी; आठ हजार जड वाहने, मात्र नाही शासकीय थांबाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 12:57 PM2020-08-07T12:57:34+5:302020-08-07T12:59:48+5:30

परप्रांतीय वाहन चालकांपुढे गैरव्यवस्थेचा प्रश्न; चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

No hotel, no water; Eight thousand heavy vehicles, but no government stop! | ना हॉटेल, ना पाणी; आठ हजार जड वाहने, मात्र नाही शासकीय थांबाच !

ना हॉटेल, ना पाणी; आठ हजार जड वाहने, मात्र नाही शासकीय थांबाच !

Next
ठळक मुद्देसोलापुरात बाजार समिती, महापालिका यांच्याकडून शासकीय हक्काचा सुरक्षित थांबा नाहीमहाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, वाशी (मुंबई) येथील बाजार समित्यांनी जड वाहनांसाठी थांबा उपलब्ध केलासोलापुरात बाळे, जुना पुणे नाका, रामवाडी गोडावून बाजूला, बोरामणी नाका, हैदराबाद रोड, जुना तुळजापूर रोड अशा आठ ठिकाणी खासगी थांबे आहेत

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि मराठवाड्याचे क्रॉसिंग सेंटर म्हणून पाहिल्या जात असलेल्या सोलापुरात जड वाहनांना कुठेही सुरक्षित शासकीय थांबा नाही़ चारही महामार्गांवर केवळ खासगी मालकी थांब्याचा आधार घेणाºया चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे येतोय़
  शहर हद्दीत नाक्यांवर जवळपास आठ हजार जड वाहने थांबून असतात़ खासगी मालकीच्या थांब्याकडून केवळ शुल्क वसूल होते़ टोल स्वरुपातून वा अन्य कररुपाने सोलापुरात महिन्याकाठी कोट्यवधींचा कर वसूल होतो़ मात्र कसलीच सुविधा नसल्याची खंत वाहतूकदारांमधून व्यक्त होत आहे.

सोलापुरात बाजार समिती, महापालिका यांच्याकडून शासकीय हक्काचा सुरक्षित थांबा नाही़ महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, वाशी (मुंबई) येथील बाजार समित्यांनी जड वाहनांसाठी थांबा उपलब्ध केला आहे़ सोलापुरात बाळे, जुना पुणे नाका, रामवाडी गोडावून बाजूला, बोरामणी नाका, हैदराबाद रोड, जुना तुळजापूर रोड अशा आठ ठिकाणी खासगी थांबे आहेत़ यांच्याकडून २४ तासांसाठी २०० रुपये शुल्क आकारतात़ या बदल्यात थांब्याशिवाय ना टॉयलेट, ना आंघोळ, ना हॉटेल, ना दवाखान्याची व्यवस्था आहे़ या वाहनांना लागणारी पंक्चर दुकाने, हवा सेंटर नाही़ अतिशय गैरव्यवस्थेत हे लोक सोलापुरात २४ तासांसाठी थांबतात.

शहर हद्दीत वा बाहेर कुठेही शासनाचा अधिकृत थांबा नसल्याने बरीच जड वाहने ही नाक्याबाहेरील पेट्रोल पंपावर इंधन भरुन बाजूच्या मोकळ्या जागेत रात्री थांबतात़ सकाळी येथून निघताना पेट्रोल पंपाचे सुरक्षारक्षकदेखील ‘खुशी’ मागितल्याशिवाय सोडत नाही़ 

राष्ट्रीय महामार्ग म्हणते, थांबे आहेत...
याबाबत राष्ट्रीय राजमार्गचे प्रबंधक संजय कदम यांच्याशी संवाद साधला असता आम्ही केवळ टोल वसूल करत नाही़ वाहतूक आणि वाहनांच्या सुरक्षेचाही विचार करतो म्हणाले़ राष्ट्रीय महामार्गाने उभारलेले छोट थांबे हे फार कोणाच्या लक्षात येत नाहीत़ भीमानगर, तुळजापूरजवळ, सोलापूर-पुणे महामार्गावर निसर्ग ढाब्याजवळ दहा ट्रका उभारतील एवढी जागा दिली आहे़ भविष्यात या जड वाहतूकदारांसाठी हॉटेल, स्वच्छतागृह उपलब्ध करुन देण्याचा प्लॅन आहे असल्याचे ते म्हणाले़

नलिनी चंदेले या महापौर म्हणून निवडून येताच मोटार मालक संघटनेने जड वाहनांच्या थांब्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती़ त्यानंतर याच शिष्टमंडळाने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली होती़ त्यांनी जय भवानी हायस्कूल परिसरातील जवळपास दहा हजार स्क्वेअर फूट मोकळी जागा सुचवून देण्याचे आश्वासन दिले होते़ पुढे काहीच झाले नाही़
- उदयशंकर चाकोते, अध्यक्ष, मोटार मालक संघटना 

बाजार समितीची परिस्थिती चांगली आहे़ पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे़ मध्यंतरी या जड वाहनांना थांबा देण्यासाठी बोरामणी रोडवर काही जागा पाहणी केली होती़ मात्र  दराच्या प्रश्नावरून हा विषय जरा बाजूला पडला आहे़ याबाबत सभेत चर्चाही झाली आहे़ पुन्हा एकदा पाठपुरावा करतोय़ सध्या अडचणीच्या प्रसंगी बाजार समितीसमोरील जनावर बाजारात तात्पुरता थांबा देतोय़ 
- विजयकुमार देशमुख, अध्यक्ष बाजार समिती

Web Title: No hotel, no water; Eight thousand heavy vehicles, but no government stop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.