तूर्त लॉकडाऊन नाही; पण मर्यादेचं उल्लंघन केल्यास दुकान महिनाभर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:21 AM2021-03-20T04:21:10+5:302021-03-20T04:21:10+5:30
बार्शीत कोविडच्या स्थितीच्या आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार सुनील शेरखाने, बीडीओ शेखर सावंत, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, तालुका ...
बार्शीत कोविडच्या स्थितीच्या आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार सुनील शेरखाने, बीडीओ शेखर सावंत, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, नायब तहसीलदार संजीवन मुंढे, आदींसह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
निकम म्हणाले की, आता बार्शीत जवळपास २०० कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. दररोज ५० रुग्णांची वाढ होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर प्रशासनाची इच्छा नसतानाही पूर्वीप्रमाणे काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. तेव्हा आता ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. असे नाही तर ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
तसेच मंगल कार्यालयात होणाऱ्या लग्नावर आता प्रशासनाची करडी नजर राहणार आहे.. पन्नास लोकांपेक्षा अधिक लोक आढळून आले तर मंगल कार्यालयदेखील सील करून कारवाई करण्यात येईल. कोणत्याही यात्रा जत्रेला परवानगी देण्यात आलेली नाही, असा खुलासा त्यांनी केला.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लोढा, किराणा असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश तोष्णीवाल, ‘आयएमए’चे सचिव डॉ. प्रशांत मोहिरे, सराफ असोसिएशनचे विनोद बुडूख, जगदाळे मामा हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. राम जगताप, आदी उपस्थित होते.
-----
अशा केल्या सूचना
आठवडा बाजाराबाबतीत बाजार समितीच्या वतीने लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. काहीही झाले तरी दुकानात मास्कशिवाय व्यक्ती आढळणार नाही याची दक्षता घ्यावी. दुकानदारांनी मास्कशिवाय ग्राहकांना प्रवेश देऊ नये. सॅनिटायझर, वॉश बेसिनची व्यवस्था करावी. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना दिल्या.
-----