लॉकडाऊन नको हो.. नियम कडक करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:23 AM2021-04-07T04:23:15+5:302021-04-07T04:23:15+5:30

लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे अनेक दुकानदार मंगळवारी आपल्या बंद दुकानापुढे केविलवाण्या चेहऱ्याने बसलेले दिसून आले. काही दुकानदारांनी नियमात न बसणारी ...

No lockdown .. Tighten the rules! | लॉकडाऊन नको हो.. नियम कडक करा!

लॉकडाऊन नको हो.. नियम कडक करा!

Next

लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे अनेक दुकानदार मंगळवारी आपल्या बंद दुकानापुढे केविलवाण्या चेहऱ्याने बसलेले दिसून आले. काही दुकानदारांनी नियमात न बसणारी आपली दुकाने उघडी ठेवल्याचे दिसून आले. तालुक्यातील लोकांना ‘लॉकडाऊन नकोय, कोविडचे नियम मात्र कडक हवेत’, अशी मागणी होत आहे. आपल्या व्यवसायावर गेल्या लॉकडाऊनप्रमाणे यंदाही आर्थिक संक्रांत येण्याची भीती अनेकांतून व्यक्त होत आहे.

...............

मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकताना आम्हा व्यापाऱ्यांना वाटले की, शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व बंद राहील; परंतु प्रत्यक्षात तर वेगळेच दिसून आलं. प्रशासनाच्या नवीन आदेशामुळे येथील व्यापारीवर्गात संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु नगरपरिषदेने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही नक्की पालन करू.

-

फुलचंद धोका, कापड व्यापारी, कुर्डूवाडी

----०६कुर्डूवाडी/लाॅकडाऊन--

कुर्डूवाडी शहरात शासनाने कोविडबाबत दिलेल्या सूचनेनुसार मंगळवारी अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने बंद ठेवण्यात आली होती. येथील काही व्यापाऱ्यांत मात्र या लॉकडाऊनबाबत संभ्रम निर्माण झाल्याने त्यांची दुकाने सुरू असल्याचे दिसून आले.

Web Title: No lockdown .. Tighten the rules!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.