कुर्डूवाडीच्या मूलभूत प्रश्नासाठी लढणाऱ्या मनसे आंदोलनाकडे कोणीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:23 AM2021-04-01T04:23:42+5:302021-04-01T04:23:42+5:30

: शहरातील सुरू असलेल्या भुयारी गटारीचे काम हे निकृष्ट असून त्याबाबत येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पदाधिकारी व संबधीत ठेकेदार यांच्यावर ...

No one to the MNS movement fighting for the fundamental question of Kurduwadi | कुर्डूवाडीच्या मूलभूत प्रश्नासाठी लढणाऱ्या मनसे आंदोलनाकडे कोणीही

कुर्डूवाडीच्या मूलभूत प्रश्नासाठी लढणाऱ्या मनसे आंदोलनाकडे कोणीही

googlenewsNext

: शहरातील सुरू असलेल्या भुयारी गटारीचे काम हे निकृष्ट असून त्याबाबत येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पदाधिकारी व संबधीत ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मनसेच्या वतीने येथील गांधी चौकात एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले. या ठिय्या आंदोलनाकडे येथील नगरपालिकेचा कोणीही जबाबदार अधिकारी वा पदाधिकारी दिवसभर फिरकला नाही.

मंगळवारी सकाळी अकरा वाजता मनसेच्या वतीने या आंदोलनाला सुरुवात केली होती. नुकतेच त्यांनी येथील उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांना याबाबतचे निवेदन दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, कुर्डूवाडी शहरातील भुयारी गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे. हे काम केवळ जलद गतीने केले जात आहे. या कामामुळे कुर्डूवाडी शहरातील नागरिकांना गेले दहा महिने धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. कोणताही अधिकारी व नगरसेवक ठेकेदार याठिकाणी फिरकत नाहीत. काम करत असताना नगरपालिकेच्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व पदाधिकारी यांनी उपस्थित राहणे कायदेशीर बंधनकारक आहे.

या आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष ओमकार चौधरी,शहर उपाध्यक्ष गणेश चौधरी, सागर बंदपट्टे,आकाश लांडे,सोमनाथ पवार,अमोल घोडके, बालाजी काळे, सुशांत मुंडे, तानाजी पाखरे,सुभाष खटके,सागर लोकरे आदींनी सहभाग नोंदविला होता.तर संबंधित आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, भारतीय युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष उमेश पाटील,बसपाचे सचिन वाळके, जनआक्रोश संघटनेचे भाऊसाहेब कांबळे,भारतीय युवा मोर्चाचे सुधीर गाडेकर,आरपीआयचे जितेंद्र गायकवाड,गणेश समदाडे,प्रा. डॉ.आशिष रजपूत,शिवसेनेचे समाधान दास,माजी नगराध्यक्ष जगन्नाथ क्षीरसागर,विकास इंगोले ,रमेश सरवदे आदींनी भेट देत पाठिंबा दिला.

३१कुर्डूूवाडी आंदोलन

कुर्डूवाडी शहरात मनसेच्या वतीने गांधी चौकात एक दिवशीय ठिय्या आंदोलन करताना मनसेचे पदाधिकारी.

Web Title: No one to the MNS movement fighting for the fundamental question of Kurduwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.