नो पेट्रोल अन् नाे डिझेल; ऑर्किडच्या ‘रँचों’नी बनविली बॅटरीवर चालणारी कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 01:24 PM2021-07-22T13:24:24+5:302021-07-22T13:24:31+5:30

देशपातळीवरील स्पर्धेत सहभाग - प्रोजेक्ट ऑफ द इअर स्पर्धेत मिळविले यश

No petrol and diesel; A battery-powered car made by Orchid's 'Ranchos' | नो पेट्रोल अन् नाे डिझेल; ऑर्किडच्या ‘रँचों’नी बनविली बॅटरीवर चालणारी कार

नो पेट्रोल अन् नाे डिझेल; ऑर्किडच्या ‘रँचों’नी बनविली बॅटरीवर चालणारी कार

googlenewsNext

सोलापूर : डसॉल्ट सिस्टीम्स एज्युकेशन आयोजित आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट ऑफ द इअर या स्पर्धेमध्ये एन.के. ऑर्किड अभियांत्रिकीने सोलापूरचे नाव उंचावत अनुक्रमे तिसरे व पाचवे पारितोषिक पटकावत आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात रोवला.

डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये जगभरातील ३८ देशांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील निकषांच्या आधारे एकूण १६ विजेत्यांना पारितोषिके मिळाली. या सोळा पारितोषिकातील ऑर्किड अभियांत्रिकीने दोन पारितोषिके पटकावली. या अभिनव संकल्पनेला पंचांनी तिसरे पारितोषिक देऊन सन्मानित केले. या प्रकल्पात सहभागी विद्यार्थी प्रथमेश ठाकरे, प्रज्ञा बागूल, चैतन्य साळुंके, पार्थ लोखंडे यांना प्रा. प्रसाद कुलकर्णी (मेकॅनिकल विभाग) यांनी मार्गदर्शन केले.

ऑर्किड अभियांत्रिकीने पटकावलेले दुसरे पारितोषिक म्हणजे लोकप्रियतेच्या मतदानावर आधारित अशा गटातून विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या ‘अर्कयानम्’ या बॅटरीवर चालणाऱ्या कारला पाचवे पारितोषिक मिळाले. प्रकल्पातील विद्यार्थी प्रज्ञा बागूल, अभिषेक तलकोकुल, प्रथमेश ठाकरे, चैतन्य साळुंके, पार्थ लोखंडे या विद्यार्थ्यांनी वीस जणांच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. या प्रकल्पास डॉ. श्रीनिवास मेतन (मेकॅनिकल विभागप्रमुख) यांनी मार्गदर्शन केले. दोन्ही संघांचे प्राचार्य डॉ. जे.बी. दफेदार, विश्वस्त व सर्व ऑर्किड स्टाफ यांनी कौतुक आणि अभिनंदन केले.

------------

फोटो ओळ - ऑर्किडच्या रँचोंनी जागतिक पातळीवर बनविलेले प्रकल्प.

 

Web Title: No petrol and diesel; A battery-powered car made by Orchid's 'Ranchos'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.