नळ नाही , पाणी नाही.. तरीही येते नळपट्टई...मग मारा निषेधाची सही

By राकेश कदम | Published: August 10, 2023 03:17 PM2023-08-10T15:17:52+5:302023-08-10T15:18:39+5:30

महापालिकेने नळ जोडणी नसताना सरसकट खाजगी पाणीपट्टी वसुली सुरू केली आहे.

No tap, no water.. still comes the tap... then hit the protest sign | नळ नाही , पाणी नाही.. तरीही येते नळपट्टई...मग मारा निषेधाची सही

नळ नाही , पाणी नाही.. तरीही येते नळपट्टई...मग मारा निषेधाची सही

googlenewsNext

राकेश कदम

सोलापूर- महापालिकेने नळ जोडणी नसताना सरसकट खाजगी पाणीपट्टी वसुली सुरू केली आहे. याविरुद्ध माजी महापौर यु.एन. बेरिया यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली.

सात रस्ता येथे सकाळी दहा वाजता सह्यांच्या मोहिमेला सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध एक हजार नागरिकांनी सह्या केल्याचे बेरिया यांनी सांगितले.

महापालिकेने मिळकत कराची बिले वाटली आहेत. यामध्ये नळ जोडणी असताना शेकडो घरांना नळपट्टी आकारण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार कार्यवाही केल्याचे महापालिका प्रशासन सांगत आहे. मात्र या आकारणीला विरोध म्हणून सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Web Title: No tap, no water.. still comes the tap... then hit the protest sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.