‘या’ नाही पण ‘त्या’ रणजितदादांना अखेर धवलदादा भेटले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 08:34 PM2019-04-20T20:34:08+5:302019-04-20T20:37:09+5:30

धवलसिंह मोहिते-पाटलांनी घेतली रणजितसिंह नाईक-निंबाळकरांची भेट

'No' but 'those' Ranjitadars finally met! | ‘या’ नाही पण ‘त्या’ रणजितदादांना अखेर धवलदादा भेटले !

‘या’ नाही पण ‘त्या’ रणजितदादांना अखेर धवलदादा भेटले !

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे व भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोन्ही उमेदवारांनी प्रचारामध्ये चुरस निर्माण केली भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांची भेट घेतल्याने आता किमान उमेदवार रणजितसिंह यांच्याबरोबर तरी सख्य जमलं अशी याबाबत राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अत्यंत चुरस निर्माण झाली असून धवलसिंह मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांची भेट घेतल्याने माळशिरस तालुक्यातील सर्वच गट एक झाल्याचे दिसून येत आहे.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर धवलसिंह मोहिते-पाटील यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने हा विषय चर्चेचा झाला होता, मात्र त्यांनी अद्याप जाहीरपणे भाजप प्रवेश केलेला नाही़ या पार्श्वभूमीवर धवलसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत बार्शीचे माजी आमदार राजा राऊत हे होते़  माढा मतदारसंघातील लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे व भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोन्ही उमेदवारांनी प्रचारामध्ये चुरस निर्माण केली आहे़ या पार्श्वभूमीवर धवलसिंह यांनी घेतलेली हा चर्चेचा विषय ठरला आहे़ धवलसिंह मोहिते-पाटील यांचे रणजितसिंह मोहिते - पाटील यांच्याशी आत्तापर्यंतच्या राजकारणात कधीच सख्य जमलेले नाही. अशात त्यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांची भेट घेतल्याने आता किमान उमेदवार रणजितसिंह यांच्याबरोबर तरी सख्य जमलं अशी याबाबत राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: 'No' but 'those' Ranjitadars finally met!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.