दोन महिने पाण्याचं टेन्शन नाही; उजनीतून सोलापूरसाठी सोडले ४.५ टीएमसी पाणी
By Appasaheb.patil | Published: September 20, 2023 02:25 PM2023-09-20T14:25:27+5:302023-09-20T14:25:34+5:30
सध्या सोलापूर जिल्हयामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे टंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उजनी धरणामध्येही पाण्याची पुरेशी आवक न झाल्यामुळे परिस्थिती आणखी कठीण झालेली आहे.
सोलापूर : भीमा नदीवरील सोलापूर, पंढरपूर, सांगोला शहरासह इतर ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजनासाठी उजनी धरणातून ४.५ टीएमसी पाणी भीमा नदीमध्ये सोडण्याचा निर्णय पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला. त्याबाबतची कार्यवाही पूर्ण झाली असून उजनीतून सोडलेले पाणी आज पंढरपुरात पोहोचणार असल्याची माहिती उजनी लाभक्षेत्र प्राधिकरण विभागाने दिली. या पाण्यामुळे सोलापूर, पंढरपूर, सांगोला शहरासह इतर भागातील पाण्याची समस्या तूर्त दोन महिने मिटली आहे.
सध्या सोलापूर जिल्हयामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे टंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उजनी धरणामध्येही पाण्याची पुरेशी आवक न झाल्यामुळे परिस्थिती आणखी कठीण झालेली आहे. अशा परिस्थितीत भीमा नदीवरील सोलापूर, पंढरपूर, सांगोला शहरासह इतर ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना पिण्यासाठी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची परिस्थिती आली होती. या सर्व परिस्थितीचा विचार करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भीमा नदीवरील सोलापूर, पंढरपूर, सांगोला शहरासह इतर ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजनासाठी उजनी धरणातून ४.५ टीएमसी पाणी भीमा नदीमध्ये सोडण्याचा निर्णय घेतला असून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिका-यांना सूचना दिलेल्या आहे. या निर्णयामुळे भीमा नदीवरील सोलापूर, पंढरपूर. सांगोला शहरासह इतर ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दोन महीने कालावधीसाठी मिटला आहे.