आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी नोडल अधिकारी अन् सेक्टर इन चार्ज दिसणार 

By Appasaheb.patil | Published: June 6, 2023 09:01 PM2023-06-06T21:01:08+5:302023-06-06T21:01:15+5:30

आषाढी यात्रेत वारकरी, दिंडी प्रमुख, पालखी प्रमुखांच्या सुचना, नियोजन आखण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Nodal officer and sector in-charge will appear for the planning of Ashadhi Yatra | आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी नोडल अधिकारी अन् सेक्टर इन चार्ज दिसणार 

आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी नोडल अधिकारी अन् सेक्टर इन चार्ज दिसणार 

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : आषाढी यात्रेत वारकरी, दिंडी प्रमुख, पालखी प्रमुखांच्या सुचना, नियोजन आखण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या नोडल अधिकाऱ्यांना डिजीटल डायरी व पालखी मार्गाचे नकाशे देण्यात येणार आहेत. याशिवाय पालखी मार्गावर सेवासुविधां पुरविण्यासाठी ठिकठिकाणी सेक्टर इन चार्ज ची नेमणूक करण्यात आली आहे.  सर्व नोडल अधिकारी हे आवश्यक त्या विभागांशी व संपूर्ण पालखी मार्गावरील सेक्टर इन चार्ज यांच्याशी वेळोवेळी समन्वय ठेवून यात्रा शांततेत व नियोजनबध्द पध्दतीने पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न होणार आहेत.

आषाढ शुध्द एकादशी २९ जून २०२३ रोजी आहे. ह्या निमित्ताने पंढरपूर शहरामध्ये भरणारी आषाढी यात्रा २२ जून ते ६ जुलै या कालावधीत होणार आहे. यात्रा शांततेत व नियोजनबध्द पार पाडावी यासाठी मंत्रालयास्तरावरील अधिकारी व  सोलापूर जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणा काम करीत आहेत. बैठका, चर्चा, पाहणी दौरा करून अधिकारी हे विविध कामे, उपाययोजना  व तयारी करण्यासंदर्भात सुचना देण्यात येत आहेत. संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गावरील करावयाच्या कार्यवाही संदर्भात नुकतीच बैठक पार पडली. पालखी तळ व मार्गावरील तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणची कामे सूचिबद्ध करून विहित वेळेत पूर्ण करावीत अशा सुचना अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिल्या आहेत.

Web Title: Nodal officer and sector in-charge will appear for the planning of Ashadhi Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.