दुचाकी-कार अपघातात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मृत्यू, मानेगाव जवळ अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 01:25 AM2023-07-04T01:25:24+5:302023-07-04T01:25:24+5:30

याप्रकरणी चालक संगमेश्वर बंडाप्पा काडादी (रा. सोलापूर) विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Non-teaching staff killed in two-wheeler-car accident, accident near Manegaon | दुचाकी-कार अपघातात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मृत्यू, मानेगाव जवळ अपघात

दुचाकी-कार अपघातात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मृत्यू, मानेगाव जवळ अपघात

googlenewsNext

सोलापूर : सुटीनमित्त घरी आलेले एक शिक्षकेतर कर्मचा-याचा बार्शी - सोलापूर महामार्गावर मानेगावजवळ कार आणि मोटारसायकल अपघातात जागीच मृत्यू झाला. गोरख चांगदेव देशमुख (वय ५२) जागीच मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव असून सोमवार, ३ जुलै रोजी सकाळी ८.३० सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी चालक संगमेश्वर बंडाप्पा काडादी (रा. सोलापूर) विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

काही दिवसांपासून बार्शी-सोलापूर महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. रस्ता चांगला झाल्यामुळे वेगवान वाहन चालकांचे वाहनांवरती नियंत्रण राहत नसल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान सोमवारी सकाळी सोलापूरहून बार्शीकडे निघालेल्या कार (एम. एच. १३/ डी. वाय. ७८००) ची दुचाकी (एम. एच. १३/ डी.के. ५६९६) ला धडक बसली. अपघातात दुचाकीस्वार गोरख चांगदेव देशमुख हे जागेवरच मरण पावले.

कारच्या काचा फोडून चालकास बाहेर काढले
रविवारी सुट्टी असल्याने गोरख स्वत:च्या गावी काळेगाव येथे आले होते. नेहमीप्रमाणे सोमवारी तांबेवाडी येथील ज्ञानदीप माध्यमिक आश्रम शाळेवर जात असताना हा अपघात घडला. सोबत घेतलेले पीठ, मीठ, चपाती अपघातानंतर रस्त्यावर विखरून पडले होते. तसेच कार अपघातानंतर रस्त्याच्या कडेला पलटी झाली. घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी धावत जाऊन गाडीच्या काचा फोडत चालकास बाहेर काढले. दरम्यान मयत गोरख चांगदेव देशमुख यांचे वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.
 

Web Title: Non-teaching staff killed in two-wheeler-car accident, accident near Manegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.