शिक्षकेतर कर्मचारी संपावर; उद्यापासून विद्यापीठ व बोर्ड परीक्षेचे कामकाज ठप्प होणार!

By Appasaheb.patil | Published: February 1, 2023 02:28 PM2023-02-01T14:28:23+5:302023-02-01T14:29:18+5:30

सोलापूर विद्यापीठासह शहर व जिल्ह्यातील ३७ अनुदानित महाविद्यालयातील ७५० शिक्षकेतर कर्मचारी गुरुवारपासून (दि.२) बहिष्कार आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे विद्यापीठ व बारावी बोर्ड परीक्षेचे कामकाज ठप्प होणार आहे.

Non-teaching staff on strike; Solapur University and board exam will be stopped from tomorrow! | शिक्षकेतर कर्मचारी संपावर; उद्यापासून विद्यापीठ व बोर्ड परीक्षेचे कामकाज ठप्प होणार!

शिक्षकेतर कर्मचारी संपावर; उद्यापासून विद्यापीठ व बोर्ड परीक्षेचे कामकाज ठप्प होणार!

googlenewsNext

सोलापूर : राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रमुख ६ मागण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरविद्यापीठासह शहर व जिल्ह्यातील ३७ अनुदानित महाविद्यालयातील ७५० शिक्षकेतर कर्मचारी गुरुवारपासून (दि.२) बहिष्कार आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे विद्यापीठ व बारावी बोर्ड परीक्षेचे कामकाज ठप्प होणार आहे.

गेल्या ५ वर्षापासून आम्ही वेळोवेळी आंदोलने केली. परंतु शासनाने अश्र्वासनाशिवाय काहीही दिले नाही. त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावे लागत आहे, असे सोलापूर विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात व सरचिटणीस रविकांत हुक्कीरे, कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले व सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभिजित जाधव व सचिव भीमा मस्के यांनी कळविले आहे.

'या' आहेत सहा मागण्या
१) सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जिवित करुन पूर्ववत लागू करा.
२) सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०.२०.३० वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करा.
३ ) सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या १४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग
लागू करुन विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालवधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करा.
४) विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्या.
५) २००५ नंतर सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा.
६) विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहित धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करा.

Web Title: Non-teaching staff on strike; Solapur University and board exam will be stopped from tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.