उत्तर तालुका: सोमवारी आठ गावातून ४२ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:22 AM2020-12-29T04:22:00+5:302020-12-29T04:22:00+5:30
सोमवारी बीबीदारफळचे १४, वडाळ्याचे १०, गुळवंचीचे ६, एकरुख-तरटगावचे ४, तळेहिप्परगा ३, खेडचे दोन तर तेलगाव व बाणेगावचे प्रत्येकी एक ...
सोमवारी बीबीदारफळचे १४, वडाळ्याचे १०, गुळवंचीचे ६, एकरुख-तरटगावचे ४, तळेहिप्परगा ३, खेडचे दोन तर तेलगाव व बाणेगावचे प्रत्येकी एक याप्रमाणे ४१ उमेदवारांचे ४२ अर्ज दाखल झाले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यापैकी ९ गावातील ४७ उमेदवारांचे अर्ज तहसील कार्यालयात सादर झाले आहेत. मंगळवार व बुधवार असे दोनच दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शिल्लक आहेत. या दोन दिवसात अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे.
२३६ सदस्यांसाठी प्रक्रिया
तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या ८७ वार्डमधून २३६ ग्रामपंचायत सदस्य निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. ८७ वार्डसाठी ८७ व ८०० पेक्षा अधिक मतदार संख्या असलेल्या वार्डासाठी अतिरिक्त २३ असे ११० मतदान केंद्र असल्याचे तहसीलदार जयवंत पाटील यांनी सांगितले.