स्वत:ला निवडून यायला जमत नाही म्हणून परिचारकांनी केले दुसऱ्याला उभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:19 AM2021-04-05T04:19:50+5:302021-04-05T04:19:50+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालकेंच्या प्रचाराचा नारळ राझंणी (ता. पंढरपूर) येथे फोडण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालकेंच्या प्रचाराचा नारळ राझंणी (ता. पंढरपूर) येथे फोडण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. संजय शिंदे, उमेश पाटील, बळिरामकाका साठे, उत्तमराव जानकर, प्रकाश पाटील, शिवाजीराव काळुंगे, साईनाथ अभंगराव, संभाजी शिंदे, विजयसिंह देशमुख, संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे उपस्थित हाेते.
पुढे जयंत पाटील म्हणाले, पंढरपूर व मंगळवेढ्यातील अपूर्ण विकासकामे हे आता भगीरथ भालके यांच्या माध्यमातून पूर्ण करावयाची आहेत. ही पोटनिवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे.
आपला उमेदवार नाही म्हणून भाजपने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचा विकास केला नाही. तसेच पंढरपूर शहरातील इसबावी परिसरातील बाबर यांचा जीव गेला, त्यावेळी भालके यांनी अर्धा तास थांबून स्पीड ब्रेकर केला असा जनमानसातला नेता म्हणून भारत भालके यांची ओळख असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पुढे दत्तात्रय भरणे म्हणाले, मी पण पालकमंत्री आहे. घरचा वाडपी असला तर जादा वाढतो. परंतु मागील वर्षी कोरोनाची अडचण नसती तर खूप काही केले असते. यापुढे पंढरपूर मंगळवेढ्याला जादा विकास निधी देण्याचा प्रयत्न करू. आपण कोणावर टीका करू नका असा सल्लादेखील भरणे यांनी दिला आहे.
पुढे भगीरथ भालके म्हणाले, रांझणी (ता. पंढरपूर) येथील श्री शंभू महादेव देवस्थानासाठी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतून दोन कोटींचा निधी दिलेला असूनदेखील विरोधक मागील ११ वर्षांचा विकासकामांचा हिशेब मागून जनतेची दिशाभूल करीत असल्याचे भालके यांनी सांगितले.
पाच हजार कोटींची कामे सुरू आहेत, गबाळ आल तर सोडू नका : साळुंखे :::::::::::::::::::
विधानसभेची पोटनिवडणूक ठेकेदार लढवत आहे. त्याची पाच हजार रुपयांची कामे सुरू आहेत. गबाळ आल तर सोडू नका असे आवाहन सभेदरम्यान जनतेला माजी आमदार दीपक साळुंखे यांनी केले आहे.
संजय मामा म्हणतात, मी खानदानी शिकारी आहे... :::::::::::
नेतेमंडळी गबाळ किती आहे बघून निर्णय घेतात; पण अडचणीत किती आहे बघून निर्णय घेतो. जयंत पाटील तुम्ही टप्प्यात आले की टिपता, पण मी खानदानी शिकारी आहे. मी बागलला काढून टिपतो. प्रस्तपाच्या विरोधात लढत असताना माझी मैत्री एकाशी झाली. पण, मैत्री वेगळी अन् राजकारण वेगळे आहे. जसे नानांनी सांगितले होते की, मी कुठेही असलो तरी मी शरद पवारांचाच आहे. तसं मी कुठेही हिंडत असलो तरी मी अजित पवारांचाच असल्याचे आ. संजयमामा शिंदे यांनी सष्ट केले.