अजून खरा रंग भरलाच नाही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 12:30 PM2019-10-01T12:30:30+5:302019-10-01T12:30:35+5:30

राजकीय: आवाज कुणाचा ?

Not yet full of true color ...! | अजून खरा रंग भरलाच नाही...!

अजून खरा रंग भरलाच नाही...!

googlenewsNext

समीर इनामदार

विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आणि लोकांचा उत्साह वाढेल अशी अपेक्षा होती, प्रत्यक्षात ग्रामीण भागात ते होताना दिसले नाही. यामागचे कारण होते ते म्हणजे रुसलेला पाऊस. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी फार मोठा नाही परंतु समाधानकारक पाऊस पडला आणि लोकांना ओढ लागली ती काळ्या कसदार मातीची कुस उजविण्याची. निवडणुका येतात आणि जातात, लोकांना प्रत्यक्षात पडले आहे, ते पोटापाण्याचे. गेल्या दोन ते तीन वर्षांत पावसाने दडी मारल्याने अनेकांना उत्पन्न मिळू शकले नाही. ग्रामीण भागात तर काही ठिकाणी पेरण्याही झाल्या नाहीत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सारं काही ठप्प पडलंय की काय? अशी भावना निर्माण झाली होती.

यंदाही तसंच काहीसं होतंय असे वाटत असताना पावसाने हजेरी लावल्याने मतदार सुखावलाय असं काहीअंशी म्हणता येईल. त्यातच उमेदवार कोण उभे राहणार आणि कोणत्या पक्षातून उभे राहणार याबद्दल स्पष्टता नाही. त्यामुळे जोपर्यंत उमेदवार आपला बी फॉर्म सादर करीत नाहीत, तोपर्यंत मतदार आपली भूमिका स्पष्ट करणार नाहीत हेही खरे आहे. त्यामुळे अजून तरी ग्रामीण भागात वातावरण तापलेले आहे, असे म्हणता येणार नाही. पुढील चार दिवसांत माहोल गरम होईल आणि मग सुरू होईल खºया अर्थाने निवडणुकांची लढाई. अर्थात आता नवरात्र महोत्सव सुरू आहे, त्यामुळे मतदार धार्मिकदृष्ट्या त्याठिकाणी आहेत. हे नऊ दिवस गेल्यानंतर मग मतदार निवडणुकांमध्ये खºया अर्थाने सहभागी होईल.

लोकांमध्ये निवडणुकांप्रती इतका उत्साह का नाही? यामागची कारणेही वेगवेगळी आहेत. काहींना राजकारणात रस नसेल, काहींचा सध्याच्या लोकप्रतिनिधींबाबत भ्रमनिरास झाला असेल, काहींना मतदान करूनही काही उपयोग होत नाही असे वाटत असेल. कारणे जरी वेगवेगळी असली तरी आपला लोकप्रतिनिधी जो पुढील पाच वर्षांसाठी निवडून देणारा असतो, त्याविषयी इतकीही नाराजी असणे हे लोकशाहीच्या दृष्टीने धोक्याचे आहे. लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले सरकार असे आपण म्हणतो, प्रत्यक्षात ते लोकांसाठी किती काम करते यावरही लोकांचा त्याविषयीचा दृष्टिकोन अधिक सजग राहतो. लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी निवडून दिलेले सरकार प्रत्यक्षात कशा पद्धतीने काम करते यावरही लोकांचा निवडणुकांबाबतचा उत्साह टिकून असतो. अथवा मतदानादिवशी दांडी मारुन फिरायला जाणे हेच सुरू राहू शकते.

Web Title: Not yet full of true color ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.