आमचंही योगदान लक्षात घ्या..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 01:13 PM2020-04-09T13:13:39+5:302020-04-09T13:14:15+5:30
कोरोना व्हायरस तथा कोवीड-१९ या महामारीने पूर्ण जगाला विळखा घातला आहे. महाराष्ट्रातही दिवसेंदिवस त्याचा फैलाव वाढत आहे. आपत्कालिन परस्थिती ...
कोरोना व्हायरस तथा कोवीड-१९ या महामारीने पूर्ण जगाला विळखा घातला आहे. महाराष्ट्रातही दिवसेंदिवस त्याचा फैलाव वाढत आहे. आपत्कालिन परस्थिती घोषित करून संचारबंदी घोषित केली आहे. घराच्या बाहेर पडण्यास प्रत्येकाला प्रतिबंध केला आहे. अशा जीवघेण्या संसर्गजन्य आजारापासून दूर राहण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. अशावेळी जनतेला अत्यावश्यक सेवा देण्यासाठी पोलीस, डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार, मीडिया हे रात्रंदिवस आपलें कार्य करीत आहेत प्रत्येकाचे कौतुक देखील होत आहे आणि ते झालेही पाहिजे. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडली पाहिजे.
परंतु घरात बसून ज्यामुळे वेळ काढू शकतो तो मोबाईल, टेलिव्हिजन, पंखा, एसी, लाईट किंवा दवाखान्यातील डॉक्टरचे ईलाज हे सर्व घडत आहे तो वीजपुरवठा अखंडित ठेवणारा, जीव धोक्यात घालून रात्रंदिवस राबणारा महानिर्मिती, महापारेषण, महावितरणचा अधिकारी- कर्मचारी यांची नोंद घेताना, उल्लेख होताना कुठे ही दिसत नाही. सहानुभूती दाखविली जात नाही. २ तास अन्नपाणी नाही मिळाले तरी चालते, १ तास रस्ता अडवला तरी चालतो, कोणत्याही कामात विलंब झालेला सहन करतो, कार्यालयीन दिरंगाई खपवून घेतो पण वीज बंद झालेली चालत नाही. वीज गेली की लगेच बेचैन होतो. लगेच कर्मचाºयांच्या नावाने लाखोली वहायला सुरू करतो.
कोणत्याही कार्यालयातील कर्मचाºयाच्या फोन क्रमांकाची नोंद आपल्याजवळ नसली तरी चालते, परंतु वीजपुरवठ्यासंबंधी संबंधी वायरमन व सबस्टेशन पासून सर्व वरिष्ठ अधिका?्यांपर्यंत सर्वांच्या फोन क्रंमाकाच्या नोंदी कुटुंबातील सर्व व्यक्तीकडे असतात. वीजपुरवठा बंद पडला की, वेळकाळ न पहाता फोनवर रात्रीबेरात्री अखंड, अर्वाच्च भाषेत जागरूकता दाखविली जाते. कर्मचाºयाला दमदाटी केली जाते. शिवाय काम पूर्ण झाल्यावरही कोणी त्याची सौजन्याने धन्यता मानील ही अपेक्षा दुरापास्त.
वीज कर्मचाºयालाही विश्रांतीची गरज असते, त्यालाही कुटुंब आहे, मुलबाळं आहेत, घरची कामे आहेत हे सर्व दुर्लक्षित करतो. म्हणूनच सतत त्रस्त, काळवंडलेले चेहरेच वीज कर्मचाºयांचे दिसून येतात.
२४ तास कामाची बांधिलकी ! शिवाय जीवघेण्या विजेशी दिवसरात्र खेळताना केंव्हा जायबंदी होईल किंवा जीव गमवावा लागेल याचा भरोसा नाही. ग्राहकांची, जनतेची मर्जी राखत, त्यांचा मानसन्मान ठेवत अहोरात्र राबणाºया वीज कर्मचाºयाला शाब्बासकीची थाप कल्पनाबाह्य ! कामाचे कौतुक आणि प्रोत्साहन हे काम करणाºया माणसात आणखी काम करण्याची उर्जा निर्माण करीत असते. प्रगत आणि जागृत देशामध्ये नोकरी हा नागरिकत्वाचा सन्मान असतो, लोकशाहीतील सजग नागरिकांनी तो जोपासला पाहिजे.??
- अमेय केत
(लेखक महापारेषणमध्ये उपकार्यकारी अभियंता आहेत.)