आषाढी वारीच्या पार्श्वभूमी पंढरपुरातील ४५० मठाअधिपतींना नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 02:09 PM2020-06-02T14:09:46+5:302020-06-02T14:12:16+5:30

पंढरपूर नगरपरिषद अलर्ट; परराज्यातून आलेल्या वारकºयांना सहारा दिल्यास होणार कायदेशीर कारवाई

Notice to 450 abbots in Pandharpur | आषाढी वारीच्या पार्श्वभूमी पंढरपुरातील ४५० मठाअधिपतींना नोटीसा

आषाढी वारीच्या पार्श्वभूमी पंढरपुरातील ४५० मठाअधिपतींना नोटीसा

Next
ठळक मुद्देसर्व लहान मोठे माठांचे व्यवस्थापक, वारकºयांना भाडेतत्वावर देण्यात येणाºया इमारतींच्या मालकांना नोटीसपरराज्यातून येणा?्या नागरिक साधकांना पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या पूर्व परवानगी शिवाय वास्तव्यास ठेवता येणार नाहीपूर्व परवानगीशिवाय नागरिक व साधकांना वास्तव्यास ठेवल्याचे निदर्शनास आल्यास आपल्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत कारवाई

पंढरपूर : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध नियंत्रणासाठी आषाढी यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत शहरातील व ग्रामीण भागातील ४५० मठाधिपतींना नोटीसा काढल्यास याची माहिती उप मुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी दिली आहे.

आषाढी यात्रा सोहळा एक महिन्यांवर आला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहर व हद्द भागामध्ये असलेल्या सर्व लहान मोठे मठ, वारकºयांना भाडेतत्वावर देण्यात येणाºया खाजगी इमारती यांचा सर्वेक्षण केले आहे. सध्यास्थितीत त्या ठिकाणी वास्तव्यास असणारे नागरिक व साधकांची नावे संकलित करण्यात आली आहेत.

सर्व लहान मोठे माठांचे व्यवस्थापक, वारकºयांना भाडेतत्वावर देण्यात येणाºया इमारतींच्या मालकांना नोटीस देण्यात आली आहे. राज्यातील व जिल्ह्यातील, परराज्यातून येणा?्या नागरिक साधकांना पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या पूर्व परवानगी शिवाय वास्तव्यास ठेवता येणार नाही. पूर्व परवानगीशिवाय नागरिक व साधकांना वास्तव्यास ठेवल्याचे निदर्शनास आल्यास आपल्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे पत्र उप मुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी दिली.

Web Title: Notice to 450 abbots in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.