‘आदिनाथ’ने जीएसटी कर भरणा न केल्याने संचालक मंडळास नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:20 AM2021-02-07T04:20:47+5:302021-02-07T04:20:47+5:30

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची आर्थिक घडी विस्कटल्यानंतर जीएसटी कराची कारखान्याकडे जमा दोन कोटींची रक्कम जीएसटी खात्याकडे भरणा न करता ...

Notice to the Board of Directors for non-payment of GST by Adinath | ‘आदिनाथ’ने जीएसटी कर भरणा न केल्याने संचालक मंडळास नोटिसा

‘आदिनाथ’ने जीएसटी कर भरणा न केल्याने संचालक मंडळास नोटिसा

Next

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची आर्थिक घडी विस्कटल्यानंतर जीएसटी कराची कारखान्याकडे जमा दोन कोटींची रक्कम जीएसटी खात्याकडे भरणा न करता संचालक मंडळाने नियमबाह्यपणे इतरत्र वापरली. थकीत रक्कम जीएसटी विभागाकडे वर्ग करावी यासाठी खात्याने कारखान्याकडे वारंवार मागणी केली होती; पण कारखान्याने कराची रक्कम भरली नसल्याने कारखान्याच्या संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात आले आहे.

कोट घेणे...

आदिनाथ कारखान्याकडे जीएसटीचे थकीत दोन कोटी रुपये देणे बाकी आहे. ती रक्कम भरली नसल्याने पकड वॉरंट निघाले आहे.

-

रमेश कांबळे, उपाध्यक्ष आदिनाथ कारखाना.

---

.. तर अडचणीला तोंड द्यावे लागेल

आदिनाथ सह. साखर कारखाना आ. रोहित पवार यांच्या बारामती अँग्रोने पंचवीस वर्षांच्या भाडे करारावर चालविण्यास घेतला आहे. जीएसटीच्या एकूण थकीत रकमेपैकी २५ टक्के रक्कम सोमवारी बारामती ॲग्रो भरणार असल्याचे वृत्त आहे. रक्कम वेळेवर न भरल्यास आदिनाथच्या संचालक मंडळाला अडचणीला तोंड द्यावे लागणार आहे.

----

आदिनाथ साखर कारखान्यास रुटीनप्रमाणे जीएसटी कराच्या थकित रक्कमेची बाकी भरण्याची मागणी जीएसटी विभागाने केलेली आहे. पकड वाॅरंट नाही.

- धनंजय डोंगरे, चेअरमन, आदिनाथ कारखाना

----

आदिनाथ कारखान्यास जीएसटीच्या थकित कर मागणीसंदर्भात कोणत्याही प्रकारची नोटीस आलेली नाही.

- अरुण बागनवर, प्रभारी कार्यकारी संचालक

-----

Web Title: Notice to the Board of Directors for non-payment of GST by Adinath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.