२१ मार्चपासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन गुण पाठविण्याच्या महाविद्यालयांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:44 PM2018-02-17T12:44:17+5:302018-02-17T12:45:11+5:30

सोलापूर विद्यापीठाच्या विविध परीक्षांचा निकाल जाहीर होत असताना, दुसरीकडे मार्च/एप्रिल महिन्यातील सत्र २,४,६ आणि ६ च्या परीक्षा २१ मार्च २0१८ पासून सुरू होत आहेत.

Notice to the colleges sending Solapur University Examination, Internal Assessment Marks from March 21 | २१ मार्चपासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन गुण पाठविण्याच्या महाविद्यालयांना सूचना

२१ मार्चपासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन गुण पाठविण्याच्या महाविद्यालयांना सूचना

googlenewsNext
ठळक मुद्देसर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेशी संबंधित असलेले अंतर्गत मूल्यमापनाचे गुण पाठवून देण्याच्या सूचना महाविद्यालयांना करण्यात आल्याविद्यापीठाशी संलग्नित असलेल्या विविध महाविद्यालयातील व विद्यापीठ परिसर मिळून सुमारे ९0 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून परीक्षा वेळेत घेणे, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल लावणे आदी कामाचेही नियोजन परीक्षा विभागाच्या वतीने करण्यात आले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १७ : सोलापूर विद्यापीठाच्या विविध परीक्षांचा निकाल जाहीर होत असताना, दुसरीकडे मार्च/एप्रिल महिन्यातील सत्र २,४,६ आणि ६ च्या परीक्षा २१ मार्च २0१८ पासून सुरू होत आहेत. त्या अनुषंगाने सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेशी संबंधित असलेले अंतर्गत मूल्यमापनाचे गुण पाठवून देण्याच्या सूचना महाविद्यालयांना करण्यात आल्या आहेत. 
सोलापूर विद्यापीठाच्या मार्च, एप्रिल व मे महिन्यात होणाºया परीक्षांचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर झाले आहे. दि.२१  मार्चपासून बी.ए.,बी.कॉम., दि.२८ मार्च - बी.एस्सी.अ‍ॅन्ड बी.एस्सी(बायोटिच, एनर्टपी व ई.सी.एस.). दि.१८ एप्रिलपासून एम.ए.,एम.कॉम., एमएसडब्लू. दि. १२ एप्रिल - बी.बी.ए.,बी.सी.ए., दि.३ मे - एम.बी.ए., एफ.ई.,एस.ई.,टीई.बीई. दि.१८ एप्रिल - बी.ए., एल.एल.बी., एल.एल.एम., पी.जी.डी.सी.ए.डीबीएम., दि.३ मे -एम.सी.ए.कॉमर्स, दि.१८ एप्रिल-एम.एस्सी., एम.सी.ए. (शास्त्र), एम.ए.(कॅम्पस) दि.३ मे-एम.ई.एम.फार्मा, दि.३ मे-एमस्सी.ए.इंजि., बी.अ‍ॅर्कालॉजी, बी.फार्मा, दि.३ मे- बी.एड., एम.एड., बी.पीएड., एम.पीएड. या परीक्षांना सुरुवात होणार आहे. 
परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या ११८ महाविद्यालयांना अंतर्गत मूल्यमापनाचे गुण पाठविण्याच्या सूचना विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, विधी व सामाजिक शास्त्रे यांचा समावेश आहे. सीजीपीए/सीबीसीएस पॅटर्न अंतर्गत ३0 गुणांचे अंतर्गत मूल्यमापनाचे कामकाज महाविद्यालयीन स्तरावर केले जाते. या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन स्तरावर मूल्यमापन करणे आवश्यक असते. या मूल्यमापन अंतर्गत विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावर ३0 गुण देण्यात येतात. विद्यार्थ्यांचे वर्तन, फिल्डवर्क, ग्रुप  चर्चा अशा विविध पातळीवर वारंवार मूल्यमापन केले जाते. 
-----------------------
च्सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या विविध महाविद्यालयातील व विद्यापीठ परिसर मिळून सुमारे ९0 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून परीक्षा वेळेत घेणे, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल लावणे आदी कामाचेही नियोजन परीक्षा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली. 

Web Title: Notice to the colleges sending Solapur University Examination, Internal Assessment Marks from March 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.