५२७ स्कुल बसमालकांना परवाना निलंबित करण्याची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 05:21 PM2019-07-31T17:21:17+5:302019-07-31T17:28:19+5:30

सोलापूर आरटीओची मोहीम; परवाना नूतनीकरण न करणाºया १० स्कूलबसवर कारवाई

Notice to Suspend License to School Bus Owners | ५२७ स्कुल बसमालकांना परवाना निलंबित करण्याची नोटीस

५२७ स्कुल बसमालकांना परवाना निलंबित करण्याची नोटीस

Next
ठळक मुद्देआरटीओ कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या पण तपासणी न केलेल्या ५२७ स्कूलबस चालकांना नूतनीकरणाविषयी नोटीसतपासणी न करता विद्यार्थी वाहतूक करणाºया बसचा परवाना निलंबित करण्यात येणारबस मालकांनी वेळ न दवडता रितसर बसची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी केले

सोलापूर : परवाना नूतनीकरण करून न घेणाºया १० स्कूल बस आरटीओच्या पथकाने मंगळवारी सकाळी पावसात पकडल्या. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी परवाना नूतनीकरण न करणाºया स्कूल बसचा परवाना निलंबित करा, असे आदेश दिल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. 

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्या आदेशान्वये मोटार वाहन निरीक्षक अजित ताम्हणकर, सहायक निरीक्षक संतोष डुकरे, सुहास ठोंबरे, नानासाहेब शिंदे यांच्या पथकाने सकाळी नऊ ते अकरा या वेळेत विविध शाळांकडे येणाºया स्कूल बसची तपासणी केली. यात परवाना नूतनीकरण न करणाºया १० बस जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये जुळे सोलापुरातील मेहता शाळेजवळून एमएच १३/ एएक्स २९४, हरिभाई देवकरण प्रशालेजवळून एमएच १३/एक्स २५९, हिंदुस्तान कॉन्व्हेन्ट स्कूलजवळून एमएच १३/एएक्स ४९५, प्रोग्रेसिव्ह स्कूलजवळून एमएच १३/एएक्स १६६, व्हीव्हीपीजवळून एमएच ४५/९०८७, इंडियन मॉडेल स्कूलजवळून एमएच १३/ डी ५०८९, सीबीएसई स्कूलजवळून एमएच १३ / एएक्स १९०, सिंहगड पब्लिक स्कूलजवळून एमएच १३/एएक्स ३४, इंडियन मॉडेल स्कूलजवळून एमएच १३/एएक्स ८२ या स्कूलबस जप्त करण्यात आल्या. 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि स्कूल बस नियमावली २०१० नुसार बसची वर्षाला तपासणी करणे आवश्यक आहे. सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ७९६ स्कूल बसची नोेंदणी करण्यात आली आहे. यातील फक्त २६९ स्कूलबस मालकांनी नियमानुसार तपासणी करून घेतलेली आहे. उर्वरित ५२७ बस तपासणी न करता विद्यार्थी वाहतूक करत आहेत. तपासणीसाठी मुदत देण्यात आलेली होती. 

जिल्हा वाहतूक समितीच्या बैठकीत स्कूलबस सुरक्षा यावर चर्चा झाली. जिल्हाधिकाºयांनी तपासणी न करणाºया बसचा परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आरटीओ कार्यालयाने मंगळवारपासून मोहीम सुरू केली आहे.

५२७ बस मालकांना नोटीस
- आरटीओ कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या पण तपासणी न केलेल्या ५२७ स्कूलबस चालकांना नूतनीकरणाविषयी नोटीस दिलेली आहे. तपासणी न करता विद्यार्थी वाहतूक करणाºया बसचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे. त्यामुळे बस मालकांनी वेळ न दवडता रितसर बसची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी केले आहे. 

Web Title: Notice to Suspend License to School Bus Owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.