सोलापूर आरोग्य अभियंता कार्यालयातील पाच जणांना नोटीसा; कामावर हजर नसणं भोवले
By Appasaheb.patil | Published: March 14, 2023 02:56 PM2023-03-14T14:56:50+5:302023-03-14T14:57:08+5:30
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेतील विविध विभागात अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी आयुक्त शितल तेली-उगले यांच्याकडे आल्या होत्या.
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयात पाहणी केली असता पाच जण अनुपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे आयुक्तांनी त्या पाच जणांना नोटीसा पाठविल्या आहेत. दरम्यान, वरिष्ठ श्रेणी लिपिक युवराज क्षीरसागर, कनिष्ठ श्रेणी लिपिक कदम, शेख, शिपाई आवटे व कोंगारी अशी नोटीसा पाठविण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेतील विविध विभागात अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी आयुक्त शितल तेली-उगले यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारीवरून आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार विभागाने अचानक पाहणी केली असता सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयात पाच जण अनुपस्थिती दिसून आली. त्यानुसार त्यांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. खुलासा आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले. या कारवाईमुळे महापालिकेच्या कर्मचारी, अधिकारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. अचानक तपासणी होणार असल्यानं सर्व कर्मचारी जागेवरच दिसत असल्याचेही पाहणीत आढळून आले.