वाहन कागदपत्रे वैधतेची सूचना केवळ साईटवरच; दंडाची प्रक्रिया सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 11:27 AM2020-08-10T11:27:24+5:302020-08-10T11:29:42+5:30

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कारभार’ लॉकडाऊनमध्ये परवाने नूतनीकरणाबाबत संभ्रमावस्था

Notice of validity of vehicle documents only on site; The penalty process continues | वाहन कागदपत्रे वैधतेची सूचना केवळ साईटवरच; दंडाची प्रक्रिया सुरूच

वाहन कागदपत्रे वैधतेची सूचना केवळ साईटवरच; दंडाची प्रक्रिया सुरूच

Next
ठळक मुद्देलॉकडाऊन काळात वाहतूक शाखा आणि आरटीओकडून वाहनांवर कारवाई सुरूकाहींचा इन्शुरन्स संपला तर काहींचा पीयूसी कालावधी संपलेला होताजड वाहन चालकाने वाहन परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केला

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : लॉकडाऊन काळात वाहन कागदपत्रे नूतनीकरण करण्याची सक्ती नसून ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वैध समजण्याबाबत शासनाने काढलेली अधिसूचना ही बाजूला पडली आहे. तिची अंमलबजावणी होत नाही. एम परिवहनची साईट अपडेट होत नसल्याने वाहतूक शाखेकडून दंडाची प्रक्रिया सुरूच आहे. तसेच अ‍ॅपवर जाऊन कागदपत्रे नियमित व नूतनीकरणासाठी प्रयत्न करता त्यावर प्रथम दंड आकारणी होते, मगच अर्जासोबतची कागदपत्रे पुढे सरकत आहेत.

लॉकडाऊन काळात वाहतूक शाखा आणि आरटीओकडून वाहनांवर कारवाई सुरू झाली. काही वाहने पोलीस ठाण्यात तर काही वाहने आरटीओ कार्यालय आणि नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर लावली गेली. तब्बल महिनाभर ही वाहने पडून होती. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर ती सोडवण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र या काळात सर्व कागदपत्रे तपासूनच वाहने सोडली. काहींचा इन्शुरन्स संपला तर काहींचा पीयूसी कालावधी संपलेला होता. काहींच्या लायसन्सची मुदतही या काळात संपून गेली होती. 

दरम्यान, या शासकीय कार्यालयातील गर्दीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून पाच ते १५ टक्के कर्मचाºयांवर सध्या कारभार सुरू आहे. या काळात आरटीओमध्ये गर्दी होऊ नये म्हणून कागदपत्रे आणि लायसन्स १ फेब्रुवारी २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या काळापर्यंत वैध समजावीत, अशी अधिसूचना शासनाने काढली आहे. मात्र तशी दुरुस्ती या साईटवर झालेली नाही. परिणामत: चौकाचौकात तपासणी मोहिमेदरम्यान पकडलेल्या वाहनांची कागदपत्रे तपासली जात आहेत़ त्यावर दंडाची प्रक्रिया सुरू आहे. ही अधिसूचना केवळ साईटवर चिकटून राहिली आहे. 

या साईटवर दुचाकीस्वार अथवा चारचाकी व जड वाहन चालकाने वाहन परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केला तर प्रथम दंड आकारणी होते, त्यानंतर ठरलेले शुल्क घेतले जाते. याचा फटका वाहनधारकांना बसतोय. दंड व कागदपत्रे तपासणारी यंत्रणा मात्र या सूचना पाळत नाहीत.

नव्या लायसन्ससाठी वेटिंग पिरियड वाढला...

  • - सध्या दहावी आणि बारावीचा निकाल लागला आहे. बहुतांश विद्यार्थी दुचाकी आणि चारचाकी लायसन्ससाठी आॅनलाईन प्रक्रिया पार पडत आहेत. तिकडे कमी मनुष्यबळावर काम चालवावे लागत असल्याने दुचाकी नवीन लायसन्ससाठी आॅक्टोबर महिन्यानंतरच्या तारखा मिळत आहेत. 
  • - सप्टेंबरपर्यंत ट्रेनिंग स्कूल बंद असल्याने चारचाकींचे नवे लायसन्सही बंद आहेत. लायसन्स नूतनीकरणासाठी आॅनलाईन अर्ज घेतला जातो़ मात्र कार्यालयात हार्ड कॉपी घेताना दोन महिन्यांचा वेटिंग पिरियड मिळतोय़ दररोज या काळात दुचाकीचे जवळपास पंधरा लायसन्स वितरित होताहेत.

एम. परिवहन अ‍ॅप साईटला काही तांत्रिक अडचणी उद्भवलेल्या दिसत आहेत़ या अडचणी समजून घेतोय़ वरच्या पातळीवर दुरुस्तीबाबत प्रयत्न सुरू आहेत़ 
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर 

एम. परिवहनच्या अ‍ॅपवर सर्व प्रकारचे लायसन्स आणि इतर परवाने ही ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वैध मानण्याच्या सूचना आहेत़ आरटीओ आणि वाहतूक पोलीस ते मानत नाहीत़ एम़  साईट अपडेट करण्यासाठी महिनाभरापासून जिल्हाधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांकडे पाठपुरावा करतोय. तरीही अपडेट होत नाही.
-सलीम मुल्ला, राज्य सचिव सिटू 

Web Title: Notice of validity of vehicle documents only on site; The penalty process continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.