हागणदारीमुक्तीसाठी हयगय, सोलापूर मनपाच्या झोन अधिकाऱ्यांना नोटिसा

By admin | Published: July 13, 2017 02:30 PM2017-07-13T14:30:04+5:302017-07-13T14:30:04+5:30

-

Notices to the Zonal officials of Hygay, Solapur Municipal Corporation for abatement | हागणदारीमुक्तीसाठी हयगय, सोलापूर मनपाच्या झोन अधिकाऱ्यांना नोटिसा

हागणदारीमुक्तीसाठी हयगय, सोलापूर मनपाच्या झोन अधिकाऱ्यांना नोटिसा

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १३ : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीत शहर हागणदारीमुक्त करण्यात हयगय केल्याचा ठपका राज्यस्तरीय समितीने ठेवल्याने याला जबाबदार असणाऱ्या मनपाच्या आठ झोनच्या अधिकाऱ्यांना अपर आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी बुधवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. हागणदारीमुक्तीचे काम पंधरा दिवसांच्या आत पूर्ण होण्यासाठी पथके व सनियंत्रण समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान योजनेची अंमलबजावणी केल्यावर हागणदारीमुक्त म्हणून घोषित केलेल्या शहरांची तपासणी करण्यासाठी राज्यस्तरीय तपासणी पथक दोन दिवस सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. विजय कुलकर्णी यांच्या अधिपत्याखालील चौघा जणांच्या पथकाने शहरातील विविध ठिकाणांना भेटी दिल्यावर उघड्यावर शौचाला जाणारे लोक आढळले. अद्याप अशी ठिकाणे असताना प्रशासनाने शहर हागणदारीमुक्त घोषित करण्याची घाई केल्याचे पथकाच्या निदर्शनाला आले. याबाबत पथकाने नाराजी व्यक्त करून ज्या ठिकाणी उघड्यावर शौचास होत असल्याचे आढळले त्या ठिकाणी तातडीने सुधारणा करण्याची सूचना दिली.पंधरा दिवसांनी हे पथक पुन्हा येणार आहे.
त्यामुळे अपर आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सर्व खातेप्रमुखांची बुधवारी तातडीने बैठक घेऊन हे काम पंधरा दिवसांच्या आत पूर्ण झाले पाहिजे अशी ताकीद देऊन सर्व विभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली़ या पथकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, सहायक अभियंता एस. बी. कारंजे, अवेक्षक महेश क्षीरसागर, उपअभियंता गंगाधर दुलंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
झोन अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागात दररोज सकाळी फिरून उघड्यावर शौचास होणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन पुन्हा असे प्रकार टाळण्यासाठी बंदोबस्त करावयाचा आहे. त्यामुळे गुड मॉर्निंग पथकाद्वारे उघड्यावर शौचास जाणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
---------------------------
पथकांवर ही जबाबदारी
उघड्यावर शौचास कोणी जाणार नाही याची खबरदारी घेणे, प्रत्येक ठिकाणी फलक लावणे, हागणदारीमुक्त घोषित ठिकाणी पुन्हा शौच होणार नाही याची काळजी घेणे, त्या ठिकाणी जेसीबीने सफाई करून वृक्षारोपण करून नागरिकांना बसण्यासाठी बाकड्याची व्यवस्था करणे, जुन्या स्क्रॅपचा वापर करून मुलांच्या व्यायामासाठी सिंगल, डबल बार बसविणे, खेळासाठी घसरगुंडी करणे, खेळाचे मैदान करून दिव्यांची व्यवस्था करणे, आहे त्या सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता ठेवणे, वीज, पाण्याची सोय पाहणे, महिला व पुरूषांसाठी वेगळी व्यवस्था करणे, दररोज टँकरद्वारे सफाई करणे, कचरा उचलणे, झोन, भाजीमंडई, मार्केट, शाळांमध्ये व्यवस्था करणे, पथकाने दररोज पाच ठिकाणी भेटी देऊन अहवाल द्यावा.

Web Title: Notices to the Zonal officials of Hygay, Solapur Municipal Corporation for abatement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.