आता ‘कोरोना’बाधित व्यक्तीलाही घरी बसून घेता येतील उपचार...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 02:09 PM2020-06-04T14:09:43+5:302020-06-04T14:14:24+5:30
चांगली बातमी; महापालिका आयुक्तांचा महत्वपूर्ण निर्णय; शहरात उद्यापासून सर्व दुकाने खुली होणार
Next
ठळक मुद्देसोलापूर महापालिकेत झाली व्यापारी, दुकानदार व उद्योजकांची बैठकसोलापूर शहरातील कोरोना रूग्णांची नियमित होतेय वाढमहापालिकेची आरोग्य यंत्रणा दिवसरात्र कार्यरत
सोलापूर : एखाद्या व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि त्याला काही त्रास होत नसेल तर होम व्कारंटाइन करुन उपचार घेता येतील अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी दिली.
टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीची तपासणी होईल. होम व्कारंटाइन झाल्यानंतर पाच दिवसानंतर तपासणी करण्यात येईल. व्कारंटाइन झालेल्या व्यक्तीच्या घरांमध्ये स्वतंत्र खोली असावी. स्वतंत्र बाथरूमची व्यवस्था असावी. या व्यक्तीची इच्छा असेल तरच त्याला होम व्कारंटाइन केले जाणार आहे. शहरात शुक्रवारपासून सर्व दुकाने खुली होत आहेत. या पार्श्वभूमीवर दुकानदार आणि उद्योजक यांच्याशी आयुक्तांनी चर्चा केली.