आता प्रत्येक शेतकरी विकास सोसायटी सभासद : सहकारमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 11:22 AM2018-06-23T11:22:09+5:302018-06-23T11:23:08+5:30
सोलापूर :बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकºयांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर आता प्रत्येक शेतकºयांना विकास सेवा सोसायटीचा सभासद करून घेणार असल्याची माहिती सहकार, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजपा प्रणित श्री सिद्धरामेश्वर परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ (हत्तूर ता. दक्षिण सोलापूर) येथील सोमेश्वर मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. गेल्या तीन वर्षांत मी कुणाला त्रास दिला का? माझ्या घराचा विषय काढण्यात आला. मी दोषी असेल तर कोणतीही शिक्षा घ्यायला तयार आहे. पण मी बांगड्या भरलेल्या नाहीत. प्रास्ताविक हणमंत कुलकर्णी यांनी केले. यावेळी उमेदवारांची ओळख करुन देण्यात आली.
यावेळी महापौर शोभा बनशेट्टी, बाबासाहेब आवताडे, माजी आमदार शिवशरण पाटील, शिवानंद दरेकर, डॉ. चंद्रशेखर हविनाळे यांची भाषणे झाली. दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापती ताराबाई पाटील, संदीप टेळे, इंद्रजित पवार, रजनी भडकुंबे, श्रीमंत बंडगर, रामप्पा चिवडशेट्टी, अण्णाराव बाराचारे, काशिनाथ कदम यांच्यासह दक्षिण तालुक्यातील पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.