आता सोलापूर जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रांमध्ये आधार कार्ड काढण्याची सोय, जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 11:25 AM2017-11-03T11:25:35+5:302017-11-03T11:28:01+5:30

जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रांमध्ये आधार कार्ड काढण्याची सोय करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी दिली.

Now the facility for the removal of Aadhaar cards in all the bridge centers in Solapur district, information of the Collector's office | आता सोलापूर जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रांमध्ये आधार कार्ड काढण्याची सोय, जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती

आता सोलापूर जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रांमध्ये आधार कार्ड काढण्याची सोय, जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती

Next
ठळक मुद्देसिव्हिलमध्ये दर बुधवारी तर कारागृहातही शिबीर होणारशासकीय कार्यालयांमध्ये आधार कार्ड काढण्यासाठी मशीनचा संच बसविण्यात येईलआधार कार्ड काढण्यासाठी मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत


लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर दि ३  : जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रांमध्ये आधार कार्ड काढण्याची सोय करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी बुधवारी दिली. तांत्रिक कारणामुळे काही महा-ई-सेवा केंद्रांमध्ये आधार कार्ड काढता येत नसले तरी लवकरच ही अडचण दूर होईल, असेही त्यांनी सांगितले. 
केंद्र सरकारकडून विविध शासकीय योजना, कामांसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात येत आहे; मात्र अनेक महा-ई-सेवा केंद्रांमध्ये आधार कार्ड काढणे बंद असल्यामुळे नागरिकांची कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेळेकर म्हणाले की, आधार कार्ड काढण्याचे काम पूर्वी खासगी यंत्रणेमार्फत होते. हे काम त्यांनी मोफत करणे अपेक्षित होते. अनेक भागातून त्यासाठी पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या. त्यानंतर हे काम सरकारी यंत्रणेमार्फत सुरू झाले. सध्या शासकीय केंद्रामध्ये आधार कार्ड काढण्यासाठी मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मशीन जीपीएससोबत कनेक्ट आहेत. यातून आधारची मशीन शासनाच्या परस्पर वापरता येणार नाही. आगामी दिवसांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, मंडलनिहाय एका भागात आणि महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये आधार कार्ड काढण्यासाठी मशीनचा संच बसविण्यात येईल. सध्या १२० ठिकाणी आधार संच देण्यात आले आहेत. आगामी दिवसात आणखी ५५ मशीन देण्यात येणार आहेत. 
---------------------------
महा-ई-सेवा केंद्रातील अडथळे 
महा-ई-सेवा केंद्रात आधार कार्ड काढणाºया आॅपरेटरचा तपशील शासनाच्या आयटी विभागाकडे देणे बंधनकारक आहे. ही माहिती दिल्यानंतर आयटी विभागाकडून त्यांना पासवर्डही देण्यात येतो. जिल्ह्यातील १७० महा-ई-सेवा केंद्रांपैकी १२० केंद्रांनी आपली माहिती पाठवली आहे. उर्वरित केंद्रांनाही लवकरात लवकर माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही माहिती ते जोपर्यंत देणार नाहीत तोपर्यंत त्यांना आधारचे काम करता येणार नाही. या कारणांमुळेच अनेक ठिकाणी आधारचे काम बंद आहे. 
-----------------------
सिव्हिलमध्ये दर बुधवारी तर कारागृहातही शिबीर होणार
दिव्यांगांना आधार कार्ड काढता यावे यासाठी छत्रपती शिवाजी सर्वाेपचार रुग्णालयात (सिव्हिल) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. दिव्यांगांना दर बुधवारी येथे आधार कार्ड काढता येईल, असेही रेळेकर यांनी सांगितले. कारागृहातील कैद्यांना शासकीय अनुदान मिळते. त्यासाठी आधार सक्तीचे आहे. त्या ठिकाणीही आधार काढण्यासाठी एक दिवस निश्चित करून काम केले जाते. 

Web Title: Now the facility for the removal of Aadhaar cards in all the bridge centers in Solapur district, information of the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.