आता ‘लालपरी’ करणार मालवाहतूक; शेतीमाल वाहतुकीसाठी १०० बस तैनात...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 02:24 PM2020-05-27T14:24:37+5:302020-05-27T14:29:49+5:30

पंढरपूर आगार; शेतकºयांच्या शेतातील माल बाजारपेठेपर्यंत नेणे सोयीचे होणार

Now ‘Lalpari’ will do the freight; 100 buses deployed for transporting agricultural commodities ...! | आता ‘लालपरी’ करणार मालवाहतूक; शेतीमाल वाहतुकीसाठी १०० बस तैनात...!

आता ‘लालपरी’ करणार मालवाहतूक; शेतीमाल वाहतुकीसाठी १०० बस तैनात...!

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटीला तोटा सहन करावा लागला फळे, भाजीपाल्यासह इतर शेतीउत्पादने वाहतुकीला परवानगी मिळाली शेतकºयांच्या शेतातील माल बाजारपेठेपर्यंत नेणे सोयीचे होणार

ज्योतीराम शिंदे 
पंढरपूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून एसटीची प्रवासी वाहतूक थांबवली आहे. यामुळे पंढरपूर बस आगाराला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. यातच आता फळे, भाजीपाल्यासह इतर मालवाहतूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, याकडेही शेतकºयांनी पाठ फिरवली तर एसटीच्या तोट्यात आणखी भर पडणार आहे. याअगोदरच एसटीची प्रवासी वाहतूक बंद केल्यापासून आजअखेर ३५ हजार ४ फेºयांद्वारे २२ लाख ७७ हजार कि. मी. अंतरावरील प्रवासासाठी ६९ कोटी रुपयांचे पंढरपूर आगाराचे उत्पन्न बुडाले आहे.

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात २२ मार्चपासून प्रवासी वाहतूक थांबवली होती. यानंतर दोन महिन्यांनी लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर २२ मेपासून जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. परंतु शाळा, महाविद्यालये, विवाह सोहळ्यांवर कायम बंदी असल्यामुळे तसेच तालुक्याच्या ठिकाणावरील बाजारपेठ पूर्णपणे खुली झाली नसल्याने प्रवाशांनी एसटीच्या प्रवासाकडे पाठ फिरवली आहे. याचा तोटा एसटी महामंडळाला सहन करावा लागत आहे. 

२२ मेपासून जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू केली असली तरी अजूनही शेकडो बस जागेवरच थांबून आहेत. जिल्ह्यांतर्गत वाहतुकीलाही प्रवाशांचा म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही. यामुळे एसटी बस रिकाम्याच फिरवाव्या लागत आहेत. याचा महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी काही प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू केली. परंतु त्याला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी आणि शेतकºयांची सोय व्हावी, यासाठी एसटी महामंडळाने आता प्रवासी वाहतुकीबरोबरच शेतीमालाची बाजारपेठेपर्यंत वाहतूक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक सुधीर सुतार यांनी सांगितले.

शेतीमाल वाहतुकीसाठी १०० बस तैनात
- एस.टी. महामंडळाकडून २२ मेपासून जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, प्रवाशांनी याकडे पाठ फिरवल्यामुळे एस.टी. बस रिकाम्याच फिरू लागल्या. याचा महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे एस.टी. महामंडळाने शेतकºयांचा शेतीमाल बाजारपेठेपर्यंत वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पंढरपूर आगाराने १०० बस तैनात केल्या आहेत. यामुळे शेतकºयांच्या शेतातील माल बाजारपेठेपर्यंत नेणे सोयीचे होणार असल्याचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक सुधीर सुतार यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटीला तोटा सहन करावा लागला आहे. याला पर्याय म्हणून फळे, भाजीपाल्यासह इतर शेतीउत्पादने वाहतुकीला परवानगी मिळाली आहे. याचा एस.टी. महामंडळाला फायदाच होईल. यासह विविध उत्पादनांची वाहतूक करण्यास परवानगी दिली तर अजूनही एस.टी. महामंडळाच्या उत्पादन वाढीसाठी याचा उपयोग होईल.
- सुधीर सुतार
वरिष्ठ आगार व्यवस्थापक, पंढरपूर

Web Title: Now ‘Lalpari’ will do the freight; 100 buses deployed for transporting agricultural commodities ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.