आता रेड झोनमधील यंत्रमाग, हातमाग व्यवसाय सुरू होणार; जिल्हाधिकाºयांचा नवा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:03 PM2020-05-26T17:03:28+5:302020-05-26T17:26:28+5:30

वैद्यकीय सुरक्षा व सुरक्षित अंतरचे नियम पाळणे बंधनकारक; कायद्यांचे उल्लंघन करणाºयांवर होणार कारवाई

Now the loom, handloom business will start in the red zone; New Collector's order | आता रेड झोनमधील यंत्रमाग, हातमाग व्यवसाय सुरू होणार; जिल्हाधिकाºयांचा नवा आदेश

आता रेड झोनमधील यंत्रमाग, हातमाग व्यवसाय सुरू होणार; जिल्हाधिकाºयांचा नवा आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढविला शासनाने १९ मे २०२० रोजी दिलेल्या सुचनेनुसार रेड झोनमधील सर्व औद्योगिक घटक चालू करण्यास परवानगी दिली सांसर्गिक क्षेत्र (कंटेन्ममेंट झोन) बाहेरील सर्व विद्युत यंत्रमाग व हातमाग चालू करण्यास परवानगी दिली

सोलापूर : सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्द वगळून सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या रेड झोनमधील सर्व औद्योगिक घटक चालू करण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास काढला.

दरम्यान, राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आहे, तत्पुर्वी शासनाने काही उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाºयांना दिले होते, त्यानुसार शासनाने १९ मे २०२० रोजी दिलेल्या सुचनेनुसार रेड झोनमधील सर्व औद्योगिक घटक चालू करण्यास परवानगी दिली आहे, त्याचबरोबरच सांसर्गिक क्षेत्र (कंटेन्ममेंट झोन) बाहेरील सर्व विद्युत यंत्रमाग व हातमाग चालू करण्यास परवानगी दिली आहे.

या कारखान्यांसाठी लागणाºया मालाची वाहतुक करणारे कर्मचाºयांना आयएलआय हा आजार नसल्याची वैद्यकीय दृष्यया तपासणी करून खात्री करावी असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे़ तसेच प्रतिबंधित सांसर्गिक क्षेत्र मधील कोणत्याही व्यक्तीला औद्योगिक  आस्थापनामध्ये काम करण्यास परवानगी देता येणार नाही असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाºया व्यक्ती, संस्था, अथवा संघटना यांच्याविरूध्द संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी कारवाई करावी असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Web Title: Now the loom, handloom business will start in the red zone; New Collector's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.