अबकी बार, सोलापूर का खासदार...आंबेडकर का वारीसदार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 08:24 IST2019-03-21T10:00:14+5:302019-03-26T08:24:48+5:30
प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणारच : सुजात आंबेडकर

अबकी बार, सोलापूर का खासदार...आंबेडकर का वारीसदार !
सोलापूर . सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर निवडणूक लढणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांचे पूत्र सुजात आंबेडकर यांनी सोलापुरात केली.
सुजात आंबेडकर म्हणाले, सोलापूरकरांची विनंती बाळासाहेबांनी स्वीकारलेली आहे. ही नुसती खुश व्हायची बाब नाही. तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी पडली आहे. अबकी बार सोलापूर का खासदार, आंबेडकर का वारीसदार, अशी घोषणाही त्यांनी केली. लक्ष्मण माने यांनी सातारा येथील सभेत जाहीर केले होते की प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा लढविणार आहेत. त्याला एक महिना झाला. पण अनेक लोकांचा त्यावर विश्वास बसला नाही. खरं तेव्हाच ही गोष्ट सर्वांनी गांभीर्याने घ्यायला हवी होती. अजून पुरावा आणि माहिती द्यायची गरज नाही.
ज्यांना आतापर्यंत डावलले. ज्या ठराविक कुटूंबांनी आजवर सत्ता भोगली. त्याला आमचा विरोध आहे. गोरगरीबांना, वंचितांना सत्तेत पोहोचविण्याची आमची भूमिका आहे, सुजात आंबेडकर म्हणाले, असेही सुजात आंबेडकर यांनी सांगितले.