आषाढीसाठी येणाºया भाविकांना मिळणार आता शुद्ध पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 01:29 PM2018-07-12T13:29:15+5:302018-07-12T13:31:14+5:30
अतुल भोसले : १५ लाख लिटर पाणी वाटपाची व्यवस्था
पंढरपूर : पांडुरंगाच्या दर्शनाची आस मनी घेऊन राज्याच्या कानाकोपºयातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरला येतात़ या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी वारकºयांना स्वच्छ मिनरल वॉटरची व्यवस्था करण्यात आली आहे. आषाढीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग केला जात असून समितीने १५ लाख लिटर मिनरल वॉटर आणि वितरण व्यवस्था उभी करण्याची तयारी केल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले यांनी दिली़
आषाढी वारी काळात दूषित पाण्यामुळे शेकडो भाविकांना डायरिया, गॅस्ट्रोसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. पंढरपुरात येणाºया भाविकांमध्ये वृद्धांची संख्या जास्त असते़ अशा भाविकांना दूषित पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. यात्रा काळात शहरात १२ ते १५ लाख भाविक येत असल्याने प्रशासनाकडून होत असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा ताण येत असतो. यातून मार्ग काढण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने काही समाजसेवी संस्थांच्या मदतीने यंदा प्रथमच शुद्ध पाणी देण्याचा उपक्रम हाती घेतल्याने भाविकांना यंदा मिनरल वॉटर पिण्यास मिळणार आहे.
यापूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आषाढी, कार्तिकी, माघ व चैत्री वारीदरम्यान दर्शन रांगेतील वारकºयांना स्वच्छ पाणी व चहाची मोफत सोय करण्यात आली होती़ मात्र यंदा प्रथमच दर्शन रांगेसह मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, भाविकांसाठी उभारलेल्या ६५ एकर परिसरासह शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मिनरल वॉटर वितरणाची व्यवस्था समितीने करण्याचे नियोजन केल्याचे समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले यांनी सांगितले.
याशिवाय यंदाही दर्शनासाठी येणाºया भाविकांचा विमा मंदिर समितीकडून उतरविण्यात येणार असून याचा भाविकांना दुर्घटनेच्यावेळी उपयोग होणार आहे. शहरातील १५ ठिकाणी समितीने मोठे एलईडी स्क्रीन बसविण्याचा निर्णय घेतला आहे़ यावर विठ्ठल गाभाºयातील देवाचे दर्शन २४ तास थेट प्रक्षेपित केले जाणार असल्याचे डॉ़ अतुल भोसले यांनी सांगितले.
गेल्या आषाढी दशमीला मुख्यमंत्र्यांनी मंदिर समितीची घोषणा केली होती़ यावर्षी नवीन समितीला काम करण्यासाठी ही पहिलीच यात्रा मिळाल्याने वारकºयांना जास्तीत जास्त सोयी देण्याचा निर्णय समिती घेणार असल्याचे डॉ़ भोसले यांनी सांगितले.
अध्यक्षांनी केली पत्राशेडची पाहणी
च्आषाढी यात्रेमध्ये दर्शनास येणाºया भाविकांच्या सुविधेकरिता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने ‘श्री’च्या पदस्पर्श दर्शन रांगेत पत्राशेड येथे उभ्या असलेल्या भाविकांना पायास खडे टोचू नयेत, यासाठी प्रथमच २४,००० चौरस फूट इतके मॅट टाकण्यात आले आहे़ त्याची पाहणी बुधवारी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले यांनी केली़ त्यांच्यासमवेत मंदिर समितीचे संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.