आता विकास होणार झटपट; प्रस्तावित कामांना मिळाली 100 मान्यता!
By रवींद्र देशमुख | Published: March 2, 2023 03:19 PM2023-03-02T15:19:35+5:302023-03-02T15:24:09+5:30
Solapur: सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रस्तावित कामांच्या १०० टक्के प्रशासकीय मान्यता झाल्या आहेत. त्यामुळे संबंधित सर्व यंत्रणांनी विहित वेळेत निधी खर्च करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यावेळी दिल्या.
- रवींद्र देशमुख
सोलापूर : सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रस्तावित कामांच्या १०० टक्के प्रशासकीय मान्यता झाल्या आहेत. त्यामुळे संबंधित सर्व यंत्रणांनी विहित वेळेत निधी खर्च करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत चालू आर्थिक वर्षात प्राप्त निधी विहित वेळेत खर्च करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह विविध खातेप्रमुख उपस्थित होते.
यावेळी सन २०२२-२३ च्या खर्चाचा यंत्रणानिहाय आढावा घेण्यात आला. तसेच, कार्यान्वयन यंत्रणांनी त्यांच्या स्तरावर राबविण्यात येत असलेल्या योजनांची सद्यस्थिती व मार्च २०२३ अखेर निधी खर्च होण्यासाठी केलेली पूर्वतयारी यांची माहिती दिली. तसेच, जिल्हा नियोजन समितीच्या जानेवारी महिन्यात पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपस्थित मुद्द्यांच्या अनुपालन अहवालावर चर्चा करण्यात आली.