आता सुट्टीच्या दिवशीही नोंदणी कार्यालयं चालू राहणार; मुद्रांक विभागाचे परिपत्रक
By Appasaheb.patil | Published: March 21, 2023 06:08 PM2023-03-21T18:08:21+5:302023-03-21T18:08:41+5:30
सोलापूर : गुढीपाडवा व मार्च अखेरच्या कामांमुळे मुद्रांक नाेंदणी कार्यालयं सुट्टीच्या दिवशीही चालू राहणार आहेत. त्यासंदर्भातील आदेश मुद्रांक महानिरीक्षकांनी ...
सोलापूर : गुढीपाडवा व मार्च अखेरच्या कामांमुळे मुद्रांक नाेंदणी कार्यालयं सुट्टीच्या दिवशीही चालू राहणार आहेत. त्यासंदर्भातील आदेश मुद्रांक महानिरीक्षकांनी जिल्हा मुद्रांक विभागाला कळविले आहे. त्यानुसार मुद्रांक जिल्हाधिकारी गो.द. गिते यांनीही यासंदर्भातील पत्रक काढले आहे.
सध्या आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील मार्च अखेर सुरू आहे. १४ मार्चपासून शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे १४ ते २० मार्च २०२३ या कालावधीत दुय्यम निबंधक श्रेणी कार्यालयातील दस्त नोंदणी १ बंद होती. त्यामुळे ब-याच दस्ताची नोंदणी होऊ शकली नाही, तसेच शासनाचा महसूलामध्ये देखील यामुळे घट झालेली आहे. आणि ज्याअर्थी, सदर बाबी विचारात घेऊन शासनाच्या महसूलात वाढ करण्यासाठी व आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये शासनाच्या महसूल इष्टांक पूर्तीसाठी २२ मार्च बुधवार गुढीपाडवा या शासकीय सुट्टीच्या दिवशी पक्षकारांच्या सोयीसाठी नोंदणी कार्यालये सुरू ठेवण्यात यावेत, असे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी निर्देशित केलेले आहे.
त्यामुळे बुधवार २२ मार्च गुढीपाडवा या शासकीय सुट्टीचे दिवशी पक्षकारांच्या सोयीसाठी सोलापूर जिल्हयातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्यात येत आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग २ दुय्यम निबंधक श्रेणी यांनी २२ मार्च व शासकीय सुट्टीचे दिवशी सह दुय्यम निबंधक वर्ग २ व दुय्यम निबंधक श्रेणी कार्यालये सुरू ठेवावे व दस्त नोंदणीचे कामकाज करावे असे मुद्रांक जिल्हाधिकारी गाेविंद गीते यांनी कळविले आहे.