आता शंभर किलोचं पोतं पेलतंय कुणाला ? पन्नास किलोच्या कट्ट्यामध्येच मिळतंय धान्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:44 AM2019-03-11T10:44:52+5:302019-03-11T10:46:53+5:30

रेवणसिद्ध जवळेकर  सोलापूर : पूर्वीचा आहार सकस होता... तशी ताकदवान मंडळीही होती. १०० किलो धान्याची पोती अलगदपणे उचलायची. आता ...

Now we have a hundred kilos of which we can afford? 50 kg of grains are available in the cut! | आता शंभर किलोचं पोतं पेलतंय कुणाला ? पन्नास किलोच्या कट्ट्यामध्येच मिळतंय धान्य !

आता शंभर किलोचं पोतं पेलतंय कुणाला ? पन्नास किलोच्या कट्ट्यामध्येच मिळतंय धान्य !

Next
ठळक मुद्देशेतकºयांनीही केले पोत्याचे वजन कमी३० किलोच्या पिशव्यांमध्येही धान्यांची खरेदी-विक्री

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : पूर्वीचा आहार सकस होता... तशी ताकदवान मंडळीही होती. १०० किलो धान्याची पोती अलगदपणे उचलायची. आता चित्र बदललेय. हायब्रीडच्या जमान्यात धान्यातील कसही निघून गेलाय अन् माणसंही कसदार राहिली नाहीत. १०० किलो (क्विंटल) धान्याचे पोते पेलण्याची ताकदही राहिली नसल्याने त्याची जागा आता कट्ट्याने (म्हणजे ५० किलो) घेतली आहे. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अडत दुकानांमध्ये शेतीमाल यायचा तो क्विंटलमध्येच. स्वत: शेतकरी आपला शेतीमाल वाहनांमध्ये भरायचे. आलेला शेतीमाल अडत व्यापारी माथाडी कामगारांच्या मदतीने दुकानात उतरवून घ्यायचे. तो काळ आता राहिला नाही. शेतकरी काय अन् माथाडी कामगार काय, क्विंटल धान्य त्यांना आता पेलवत नाही. आता शेतकरी, व्यापारी कट्ट्याची भाषा बोलू लागले आहेत. ५० किलोचा कट्टा असला तरी काही शेतकरी मात्र ६० ते ७० किलोच्या पोत्यात धान्य घेऊन येत असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी सचिन घटोळे, शिवराज निरगुडे यांनी सांगितले. 

माल उतरवणे अथवा भरणे असो... माथाडी कामगार एका पोत्याला ५ रुपये मजुरी घेत असतात; मात्र दिवसभर कष्ट उपसत असताना हेच माथाडी कामगार मात्र शेतकºयांच्या ६० ते ७० किलोच्या एका पोत्यालाही तेवढेच दर आकारुन त्यांच्याविषयीची आपली भावनाही व्यक्त करताना दिसतात. 

आम्ही कधीच शेतकºयांची अडवणूक करीत नाही. उलट त्यांना आम्ही माथाडी कामगार सौजन्याने वागणूक देत असल्याचे माथाडी कामगार सिद्धाराम हिप्परगी, प्रशांत कोळी, इरेश शेरे, श्रीमंत हिप्परगी यांनी सांगितले. पूर्वी अडत, भुसार दुकानांमधून १०० किलो धान्याचे पोते किराणा दुकानांमध्ये जायचे. आता हेच पोते ५० किलोमध्ये म्हणजे कट्ट्यात येऊ लागले आहे. वास्तविक ग्राहकांनाही कट्ट्याचा हा व्यवहार सोयीचा ठरत आहे. धान्य घेण्याऐवजी टप्प्याटप्प्याने घेणे ग्राहक अधिक पसंत करीत असल्याने क्विंटलऐवजी कट्टा व्यवहाराला व्यापारी आणि ग्राहकही अधिक पसंती देताना दिसतात. 

आता प्लास्टिकच्या पोत्यातूनही धान्य

  • - मालाची ने-आण करताना माथाडी कामगारांकडून अनेकवेळा पोत्याला हूक लागले जातात. हूक लागल्यामुळे एक तर धान्याची गळती होते. त्यामुळे शेतकºयांना थोडा फटकाही बसतो. शेतकरी आणि ग्राहकांसाठी आता गोणीऐवजी प्लास्टिकच्या पोत्याचा वापर सुरु आहे.
  • - पूर्वी एकत्र कुटूंब पद्धत होती. त्यामुळे धान्य क्विंटलमध्ये खरेदी व्हायचे. बोटावर मोजण्याइतपत मंडळी सोडली तर ही पद्धत कुठे दिसत नाही. त्यामुळे २० किलो, ३० किलोच्या पोत्यातही धान्य मिळू लागले आहे. आपल्या दुचाकीवरुनही धान्याच्या पिशव्या अथवा कट्टे ग्राहकांना सहजपणे नेता येतात. 

तांदूळ, गहू, डाळ आदी धान्य आता प्लास्टिकच्या पोत्यातूनच येऊ लागले आहे. या पोत्याला हूक लावण्याची गरज नाही. या पोत्यातून धान्याची गळती होत नाही. 
-सचिन घटोळे, व्यापारी.

Web Title: Now we have a hundred kilos of which we can afford? 50 kg of grains are available in the cut!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.