उपकारागृहातील बाधित आरोपींची संख्या शुन्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:22 AM2021-05-21T04:22:49+5:302021-05-21T04:22:49+5:30

पंढरपूर उपकारागृहात न्यायालयीन कोठडी मिळालेल्या ५५ आरोपींना ठेवण्यात येते. उपकारागृहामध्ये ७ रूम आहेत. यामुळे एका रूममध्ये ८ ते १० ...

The number of affected accused in the sub-jail is zero | उपकारागृहातील बाधित आरोपींची संख्या शुन्यावर

उपकारागृहातील बाधित आरोपींची संख्या शुन्यावर

Next

पंढरपूर उपकारागृहात न्यायालयीन कोठडी मिळालेल्या ५५ आरोपींना ठेवण्यात येते. उपकारागृहामध्ये ७ रूम आहेत. यामुळे एका रूममध्ये ८ ते १० आरोपींना ठेवण्यात येते. काही महिन्यांमध्ये पंढरपूर कारागृहातील अनेक आरोपींना कोरोनाची लागण झाली होती. त्याचबरोबर सांगोला, मंगळवेढा आदी तालुक्यांतील उपकारागृहातील आरोपींना देखील कोरोनाची लागण झाली होती. सांगोला तालुक्यातील २७ व मंगळवेढा तालुक्यातील १३ आरोपींचे उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन करण्यात आले होते.

---

टेस्ट निगेटिव्ह आली तरच भेटण्यास परवानगी

आरोपींना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांना व वकिलांना परवानगीशिवाय भेटता येणार नाही, असे आदेश उपकारागृहाच्या अधीक्षक तथा तहसीलदारांनी काढले आहेत. त्याचबरोबर भेटायला येणाऱ्या नातेवाइकांनी कोरोनाची टेस्ट करावी. त्यांचा अहवाल निगेटिव्ह असेल तर भेटण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. ----

जेवण पुरवणाऱ्या ठेकेदाराचीही चाचणी

आरोपींना जेवण पुरवणाऱ्या ठेकदाराची देखील सतत कोरोनाची टेस्ट करण्यास सांगितले आहे. जेवण पुरवणाऱ्या ठेकदाराची दर १० ते १५ दिवसांनंतर कोरोना टेस्ट करून त्याचा अहवाल पाहूनच त्याला जेवण वाटप करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही कडक नियमावली सुरू केल्यापासून उपकारागृहातील एकही आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नसल्याचे तहसीलदार बेल्हेकर यांनी सांगितले.

Web Title: The number of affected accused in the sub-jail is zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.