नान्नजमध्ये कोरोना बाधितांची संख्या ४३; तिºहे तांड्यातही आढळले १५ रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 11:44 AM2020-07-23T11:44:43+5:302020-07-23T11:49:54+5:30
उत्तर तालुक्यातील कोरोनाच्या संख्येत होतेय घट; नागरिक घेत आहेत काळजी...
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे बाधितांची एकूण संख्या ४३ झाली आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यात आतापर्यंत ९०१ रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये नान्नजमध्ये रविवारी १२३ टेस्टमध्ये १५ तर मंगळवारी १०० टेस्टमध्ये १७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले़ यापूर्वी उपचारासाठी दाखल झालेल्यांमध्ये ११ बाधित रुग्ण नान्नजमधीलच होते़ रॅपिड अँटिजेन तपासणीत मार्डीत ११४ मध्ये १०, कोंडीत ९७ मध्ये ५, तिºहे तांड्यावर १५, बीबीदारफळ येथे १३ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.
नान्नजमधील नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे़ तालुक्यात अन्य गावात एकही बाधित रुग्ण आढळला नाही. पाकणी व तिºहे येथे रुग्ण वाढू लागल्यानंतर नागरिक सजग झाले. पाकणी ग्रामपंचायतीने सॅनिटायझर, मास्क तसेच जंतुनाशक फवारणी केल्याचे सरपंच शोभा गुंड यांनी सांगितले. बीबीदारफळ येथील प्रत्येकजण काळजी घेत असल्याचे डॉ. अभिजित साठे यांनी सांगितले.
वडाळा गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी निर्णय घेतला की त्याची अंमलबजावणी संपूर्ण गावकरी करतात. वडाळ्यात जनता कर्फ्यू, मास्क व सॅनिटायझरचा वापर ग्रामस्थ करतात. बाहेरगावच्या लोकांना गावात येण्यास बंदी आहे़
- जितेंद्र साठे, उपसरपंच, वडाळा
नान्नजमध्ये दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे़ याचे कारण नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत़ त्यामुळे आता ४३ रुग्णसंख्या झाली आहे़ त्यामुळे नागरिकांनी गंभीर होऊन सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी़
- डॉ. संतोष बारसोळे,
वैद्यकीय अधिकारी