कोरोनाबाधित रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:37 AM2020-12-12T04:37:45+5:302020-12-12T04:37:45+5:30

गावात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होऊ नये म्हणून बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, माजी सरपंच बाळासाहेब लोकरे, माजी उपसरपंच अनिल ...

The number of coronary artery disease is increasing day by day | कोरोनाबाधित रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ

कोरोनाबाधित रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ

Next

गावात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होऊ नये म्हणून बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, माजी सरपंच बाळासाहेब लोकरे, माजी उपसरपंच अनिल घाडगे, ग्रामविकास आधिकारी विष्णू गवळी, पोलीसपाटील मनीषा कांबळे, वैद्यकीय अधिकारी व कोरोना ग्राम समितीच्या मार्गदर्शनाखाली दोनवेळा संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवले होते. उपाययोजना करूनही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. गावात चार महिन्यांत तब्बल ७३ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. तसेच ९ डिसेंबर रोजी सुस्तेत पहिला कोरोनाबळी गेल्याची माहिती आरोग्यसेविका सरस्वती चौगुले यांनी दिली.

कोट :::::: सुस्ते गावात कोरोनाबाधित रुग्णांची झापाट्याने वाढ होत आहे. यावर उपाययोजना राबवण्यासाठी कर्मचाऱ्यांना कळविले आहे. मी स्वतः दोन दिवसांनी सुस्ते गावाला भेट देणार आहे.

- डाॅ. एकनाथ बोधले, तालुका आरोग्य अधिकारी, पंढरपूर

----

कोरोनापासून बचाव होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर, चौकात बोर्ड लावले आहेत. तरीही नागरिक कोणत्याही नियमाचे पालन करत नाहीत. यापुढे तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

- विष्णू गवळी, ग्रामविकास आधिकारी, सुस्ते

Web Title: The number of coronary artery disease is increasing day by day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.