टाळेबंदीचे निर्बंध उठविल्यानंतर सोलापुरात नवीन रुग्णांच्या संख्येत पडतेय भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 09:24 AM2020-06-10T09:24:18+5:302020-06-10T09:26:32+5:30
सारीने बाधित रुग्ण वाढले; सर्वांनी काळजी घ्यावी, प्रशासनाने केले आवाहन
सोलापूर : टाळेबंदीचे निर्बंध उठविल्यानंतर सोलापुरातील सर्व व्यवहार सुरळीत होत असतानाच सर्वांना चिंता करायला लावणारी बाब पुढे येत आहे. मंगळवारी शहरात आढळलेल्या ४७ रुग्णांपैकी ४३ रुग्ण नव्याने आढळले आहेत. संपकातून बाधा झालेले फक्त चारच रुग्ण आहेत.
सोलापुरात अत्यावश्यक सेवा वगळता आता इतर दुकाने खुली करण्यात आली आहेत. नागरिकांनाही काम व खरेदीसाठी सायंकाळी पाचपर्यंत मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. त्याचप्रमाणे एकल दुकाने उघडण्यास परवानगी असल्याने व्यापारीपेठांमध्ये दुकानात खरेदीसाठी गर्दी होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. व्यापारी बाजारपेठ खुली करताना प्रशासनाने फिजीकल डिस्टन, मास्क व सॅनीटायरझरचा वापर अनिवार्य केला आहे. तरीही गर्दीच्या ठिकाणी जाताना दक्ष रहा.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने मंगळवारी जो अहवाल प्रसिद्ध केला आहे, त्यामध्ये सारीची लागण झालेले ४३ नवीन रुग्ण आहेत. यापूर्वीच्या प्रतिबंधीत क्षेत्राबरोबर शहरातील गावठाण आणि हद्दवाढ भागातील लोकांना लागण झाल्याचे दिसून येत आहे. होटगी व विजापूररोडवरील नगरात राहणाºया नागरिकांना बाधा झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोरोणापासून बचाव करण्यासाठी गरज असेल तर घराबाहेर पडा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असे आवाहन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे. तसेच कोरोणा रुग्ण आढळलेल्या ठिकाणी नागरिकांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी व ज्येष्ठांचा सर्व्हे करण्यासाठी इच्छुकांनी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
शहरात आढळलेले रुग्ण
मंगळवारी शहरात आढळलेले रुग्ण पुढील ठिकाणचे आहेत. विश्वकर्मा अपार्टमेंट, होटगीरोड: १, तेलंगी पाच्छापेठ: १, न्यू पाच्छापेठ: ५, लक्ष्मी नगरसिंह झोपडपट्टी: १, बेगमपेठ: १, घोंगडेवस्ती: १, सोमवारपेठ: १, भवानीपेठ: ६, मंत्रीचंडकनगर: २, शिवसेना कार्यालय, शुक्रवारपेठ: १, सुशीलनगर: १, दक्षिण कसबा: ३, जुनी पोलीस लाईन:१, रेल्वे लाईन: १, राजेंद्र चौक: २, मार्कंडेयनगर: १, इंदिरानगर:१, शनिवारपेठ:१, रविवारपेठ:१, उत्तर कसबा:१, बागेवाडीकर हॉस्पीटल:१, वसंतविहार:१, कस्तुरबा गांधीनगर:१, न्यू संजयनगर:१, ढोरगल्ली: २, मड्डीवस्ती: १, विनायकनगर:१, अशोक चौक: १, आदित्यनगर:१, बेघर हौसिंग सोसायटी: १, धरमशीलाईन: १, विश्वकरण संकुल, होटगीरोड:१.