सोलापुरातील कोरोना रूग्णसंख्येने गाठले अर्धशतक; अक्कलकोट, दक्षिणमध्ये सर्वाधिक रूग्ण
By Appasaheb.patil | Published: March 27, 2023 07:59 PM2023-03-27T19:59:12+5:302023-03-27T19:59:37+5:30
आप्पासाहेब पाटील सोलापूर : सोलापूर शहरासोबतच ग्रामीण भागात आता कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात ४४ तर ग्रामीण भागात ...
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर शहरासोबतच ग्रामीण भागात आता कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात ४४ तर ग्रामीण भागात १४ असे एकूण ५८ रूग्ण उपचार घेत आहेत.
दरम्यान, शहरात रविवारी ३० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली, त्यापैकी २७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. साबळे नागरी आरोग्य केंद्र परिसरात ३ रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. १६ ते ३० वयोगटातील २ तर ३१ ते ५० वयोगटातील एका रूग्णाचा समावेश आहे. सध्या शहरात बाधित असलेले ४४ रूग्ण आहेत. त्यात २२ पुरूष तर २२ स्त्री रूग्ण आहेत. शहरात आजपर्यंत ३४ हजार ६३८ रूग्ण आढळून आले तर आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १ हजार ५१९ एवढी आहे. वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, मास्कचा वापर करा, कोणतेही लक्षणं दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, कोणताही आजार अंगावर काढू नका असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
ग्रामीण भागात १४ रूग्णावर उपचार सुरू..
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १४ रूग्णावर उपचार सुरू आहेत. अक्कलकोट ३, बार्शी १, करमाळा १, माढा २, उत्तर सोलापूर १, पंढरपूर १, दक्षिण सोलापूर ५ असे एकूण १४ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.