सोलापुरातील कोरोना रूग्णसंख्या पोहोचली ३७ वर; कमी वयातील रूग्ण अधिक
By Appasaheb.patil | Published: March 31, 2023 01:58 PM2023-03-31T13:58:09+5:302023-03-31T13:58:39+5:30
गुरूवारी ४८ रूग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यातील ४७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सोलापूर : मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरातील कोरोना रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने एकच रू्ग्ण आढळून आला असून सोलापुरातील कोरोना रूग्णांची संख्या ३७ वर पोहोचली आहे.
दरम्यान, गुरूवारी ४८ रूग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यातील ४७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा रूग्ण साबळे नागरी आरोग्य केंद्र परिसरातील असून त्याचे वय ५१ ते ६० वर्षाखालील आहे. शिवाय काल ८ रूग्ण बरे होऊन घरी गेल्याचीही नोंद अहवालात झाली आहे. आतापर्यंत सोलापूर शहरातील कोरोना रूग्णांची संख्या ३४ हजार ६६१ एवढी असून मृतांची संख्या १ हजार ५१९ एवढी झाली आहे.
३३ हजार १०५ रूग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ३७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील २१ पुरूष तर १६ महिला आहेत. दरम्यान, लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे, मास्कचा वापर करावा, लक्षणं आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांना भेटावे, औषधोपचार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.