करकंबमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली सत्तरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:23 AM2021-04-20T04:23:20+5:302021-04-20T04:23:20+5:30
करकंब (ता. पंढरपूर) येथे दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जनजागृती समितीतर्फे सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी ...
करकंब (ता. पंढरपूर) येथे दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जनजागृती समितीतर्फे सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपसरपंच आदिनाथ देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार सरवदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभा साखरे, प्रा. सतीश देशमुख, ग्रामपंचायत सदस्य महादेव व्यवहारे, सावता खारे, ॲड. शरद पांढरे, सचिन शिंदे, राहुल शिंगटे, मुस्तफा बागवान, कृषी सहाय्यक लिंगे, ग्रामसेवक के.एच. नवले, केंद्रप्रमुख आप्पासाहेब माळी, संजय धोत्रे, काका देशमुख, व्यापारी कमिटीचे धनंजय इदाते, आलेकर, आशासेविका आदी उपस्थित होते.
प्रांताधिकाऱ्यांनी दिली करकंबला भेट
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडक यांनी करकंबला भेट देऊन एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनास मार्गदर्शन केले. संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करून मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सचा वापर करून स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले.