वाळू चोरांची मुजोरी वाढली; गाडीला दुचाकी आडवी लावून मंगळवेढा तहसीलदाराची गाडी रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 09:04 AM2020-08-09T09:04:00+5:302020-08-09T09:04:07+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

The number of sand thieves increased; The two-wheeler was parked horizontally and stopped on Tuesday | वाळू चोरांची मुजोरी वाढली; गाडीला दुचाकी आडवी लावून मंगळवेढा तहसीलदाराची गाडी रोखली

वाळू चोरांची मुजोरी वाढली; गाडीला दुचाकी आडवी लावून मंगळवेढा तहसीलदाराची गाडी रोखली

googlenewsNext

मंगळवेढा : बेकायदेशिररित्या टमटममधील वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या वाहनासमोर दुचाकी आडवी लावून अडथळा आणल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी फिर्याद दाखल केली असून तालुक्यात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची कुणकुण लागताच पेट्रोलिंगसाठी चालक अजित मुलाणी व विजय रजपुत असे तिघे सरकारी वाहनाने कारवाईसाठी जात असताना दामाजी कारखाना चौकात उचेठाणकडून येणाऱ्या टमटमवर कारवाई करून ताब्यात घेत असताना विना क्रमांकाच्या दोन दुचाकी अडवून लावून अडथळा निर्माण केल्याप्रकरणी विजय नाईकवाडी व कपिल परचंडे (पुर्ण पत्ता माहीत नाही) या दोघांवर गुन्हा दाखल केला.

Web Title: The number of sand thieves increased; The two-wheeler was parked horizontally and stopped on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.